ETV Bharat / city

Makar Sankranti : संक्रांतीत पतंग उडवणाऱ्यांची संख्या कमी, कोरोनामुळे पतंग व्यवसायावरच संक्रात - पर्यायी व्यवसाय

कोरोना आणि ओमायक्रॉनमुळे देशातील सर्वच उद्योगधंद्यांवर आर्थिक संकट आले आहे. दोन दिवसांवर मकर संक्रांत ( Makar Sankranti ) हा सण आहे आणि संक्रांत म्हटल की तिळगुळ आणि आकाशात विहरणाऱ्या रंगबेरंगी पतंग ( Kite Business in Trouble ) डोळ्यासमोर येतात. मात्रा, कोरोनामुळे या व्यवसायालाही फटका बसल्याने आता या व्यवसायात उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना इतर पर्यायी व्यवसाय अवलंबून रहावे लागत आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 12, 2022, 8:55 PM IST

Updated : Jan 13, 2022, 5:08 PM IST

ठाणे - कोरोना आणि ओमायक्रॉनमुळे देशातील सर्वच उद्योगधंद्यांवर आर्थिक संकट आले आहे. दोन दिवसांवर मकर संक्रांत ( Makar Sankranti ) हा सण आहे आणि संक्रांत म्हटल की तिळगुळ आणि आकाशात विहरणाऱ्या रंगबेरंगी पतंग ( Kite Business in Trouble ) डोळ्यासमोर येतात. मात्रा, कोरोनामुळे या व्यवसायालाही फटका बसल्याने आता या व्यवसायात उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना इतर पर्यायी व्यवसाय अवलंबून रहावे लागत आहे.

कोरोनामुळे पतंग व्यवसायावरच संक्रात

अब्दुल मेमन हे मागील 45 वर्षांपासून ठाण्यात पतंग व मांजा विक्रीचा व्यवसाय करतात. मेमन यांच्याकडे मकरसंक्रांत निमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या पतंगीपासून मोठ्या पतंग तसेच रंगीबेरंगी व विविध प्रकारचे मांजे विक्रीसाठी आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेली टाळेबंदी त्यानंतरचा अवकाळी पावसाचा मोठा फटका या व्यवसायावर झाल्याने यंदा कमी प्रमाणात पतंगी विक्रीसाठी बाजारपेठेत आल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविणाऱ्यांची संख्या कोरोनामुळे कमी झाली आहे. यामुळे पतंग विक्रीवर याचा प्रचंड परिणाम झाला असल्याचे दुःख पतंग विक्रेते मेमन व्यक्त करत आहेत.

सात पैशापासून सुरू केली पतंग विक्री - मागील 45 वर्षांत पतंग विक्रीच्या व्यवसायात अनेक बदल मेनन यांनी पाहिले आहे. सुरुवातीला 7 पैसे दोन आणे, अशा पतंगी विक्री केलेल्या बाजारात आजही मेनन तीन रुपयांपासून 60 रुपयांपर्यंतचे पतंग विकतात. मांज्यामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे मेनन यांनी सांगितले. सुरुवातीला फक्त कागदाचे पतंग होते मागील 15 वर्षांपासून प्लास्टिकच्या येत आहेत. यावरील कार्टून्सची डिझाइन लोकांना आवडतही आहे.

भाजी विक्रीचाही व्यवसाय - मागील दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मेमन यांचे उत्पन्न खूप कमी झाले आहे. केवळ पतंग व मांजा विक्री करुन उदरनिर्वाह होऊ शकत नसल्याने त्यांनी सोबतच भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

हेही वाचा - Fines To Transporters In Thane : कोरोना नियमांचे वाहनधारकांकडून उल्लंघन; पोलिसांनी 11 लाखांचा दंड केला वसूल

Last Updated : Jan 13, 2022, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.