ठाणे - दिल्लीतून कितीही प्रयत्न झाले तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही अशा शब्दात सुप्रियाताई सुळे यांनी पवार कुटुंबीयांवर होत असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या धाडींचा समाचार घेतला. नवरात्री निमित्त सुप्रिया सुळे या आज ठाण्यातील देवीचे दर्शन घेण्यासाठी ठाण्यात आल्या होत्या. दरम्यान, सध्या ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर पवार कुटुंबीय असल्याने पवार कुटुंबातील अनेक सदस्यांच्या उद्योगांवर आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. त्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी वरील टिप्पणी केली आहे.
नवरात्र म्हणजेच माझी आई आहे
कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेली मंदिरे प्रदीर्घ काळानंतर काल घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर राज्यातील मंदिर खुली झाली आहेत. त्यानंतर, आज काळातील पाचपाखडी परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरात आरती करण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. दरम्यान, माझी आई वर्षातून एकदाच नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करायची त्यामुळे नवरात्र म्हणजेच माझी आई आहे. असही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.
आमचे नाते तुटणार नाही
संघर्ष करणे ही पवार कुटुंबीयाची खासीयत आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, असे सूतोवाच त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधी झूकला नाही आणि झूकणार नाही त्यामुळे आलेल्या परिस्थितीला आम्ही धीराने तोंड देत संघर्ष करू असही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा - कोल्हापूर : दुसऱ्या दिवशीही अजित पवार यांच्या बहिणीच्या ऑफिसवर आयकर विभागाचे छापे