ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: ठाण्याच्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel Eknath Shinde ) यांनी महाविकास आघाडी सरकारसह ( Mahavikas Aghadi government ) पक्षप्रमुखांना ठेंगा दाखवत ४२ आमदारांसह गुवाहाटी गाठली. मुंबईत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच शिवसैनिकांनी विरोध दर्शविला. मात्र, शिंदे यांच्या भूमिकेला ठाण्यातील बहुतांश शिवसैनिकांकडून ( Shiv Sainiks support Ekwath Shinde )पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनीही आपला पाठींबा शिंदे यांना दर्शवला आहे.

Shiv Sainiks support Ekwath Shinde
शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा
author img

By

Published : Jun 24, 2022, 1:07 PM IST

Updated : Jun 24, 2022, 1:30 PM IST

ठाणे - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel Eknath Shinde ) यांनी महाविकास आघाडी सरकारसह ( Mahavikas Aghadi government ) पक्षप्रमुखांना ठेंगा दाखवत ४२ आमदारांसह गुवाहाटी गाठली. मुंबईत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच शिवसैनिकांनी विरोध दर्शविला. मात्र, शिंदे यांच्या भूमिकेला ठाण्यातील बहुतांश शिवसैनिकांकडून पाठिंबा ( Shiv Sainiks support Ekwath Shinde ) मिळत असल्याचे दिसून येत आहे. ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनीही आपला पाठींबा शिंदे यांना दर्शवला आहे. राज्यातील पहिल्याच जिल्हाप्रमुखाने पाठिंबा दर्शवला असून शाखाप्रमुख तसेच विभागप्रमुखांनीही शिंदे यांच्या सोबत असण्याला सहमती दर्शवली आहे.

ठाण्याच्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी - ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आघाडी सरकारमधून फारकत घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नावाने खडे फोडले जात आहे. मात्र, ठाण्यात वातावरण शांत आहे. ठाण्यातील शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्याचे दिसत आहे. त्याचे प्रतिबिंब शहरभर लागलेल्या बॅनरबाजीतून दिसून येत आहे. अनेकांनी सोशल मिडियातून शिंदे यांच्या वाटचालीला सहमती दर्शवल्याचे दिसून येत आहे.

Shiv Sainiks support Ekwath Shinde
शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

फेसबुकच्या माध्यमातून अनेकांनी पाठिंबा दर्शवत पोस्ट टाकल्या आहेत. ठाण्यामध्ये आत्तापर्यंत कुठेही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात जाहीर मतप्रदर्शन झाल्याचे दिसलेले नाही. दरम्यान, गेले दोन दिवस कुठलीही प्रतिक्रिया न देणारे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी ट्वीटरवर एकनाथ शिंदे यांची छबी झळकवत 'साहेब... आम्ही तुमच्या सोबत ... आमची साथ धगधगत्या हिंदुत्वाच्या ज्वाळांना 'असे ट्विट टाकले आहे.

Shinde's role is supported by Shiv Saunis in Thane
शिंदे यांच्या भूमिकेला ठाण्यातील शिवसौनिकांचा पाठिंबा

हेही वाचा - Maharashtra Political Crisis: हम हार नही मांनेगे ... आता आमची वेळ, सरकार कार्यकाळ पुर्ण करणार - राऊत

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : पवारांना धमकी ही भाजपची भूमिका आहे का ? राऊतांचा मोदी, शहांना थेट सवाल

Last Updated : Jun 24, 2022, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.