ETV Bharat / city

Govinda Insurance : गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेची आयुक्तांकडे मागणी - Thane Palghar District President Mns

शहरातील गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ( Palghar District President Avinash Jadhav ) यांनी ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा ( MNS's demand to the commissioner ) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Govinda Insurance
गोविंदा संघांचा विमा
author img

By

Published : Aug 3, 2022, 10:59 PM IST

ठाणे - वसई - विरार महापालिकेने त्यांच्या हद्दीतील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर, ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ( Palghar District President Avinash Jadhav ) यांनी ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा ( MNS's demand to the commissioner ) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मुंबई, नवी मुंबई महापालिकासोबत राज्यातील सर्व बड्या महापालिकानी पुढाकार घेऊन अशा प्रकारे गोविंदा पथकांचा विमा उतरवावा.असेही अविनाश जाधव यांनी बोलताना सांगितले.

गोविंदा संघांचा विमा

गोविंदा मंडळांचा सरावही जोमाने सुरु - कोरोनाचे सावट सरल्याने यंदा सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या 'ठाणे' नगरीलाही दहीहंडीचे वेध लागले आहेत. यंदा १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला असुन गोविंदा मंडळांचा सरावही जोमाने सुरु आहे. कोरोना काळात दोन वर्ष गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक सणांवर आलेल्या निर्बंधामुळे मराठी मनावर मरगळ आली होती. परंतु यावर्षी मात्र सर्व सण जोषात साजरे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गणेश भक्त आणि गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गोविंदा पथकांचा विमा, वसई विरार महापालिकेचा निर्णय - या अनुषंगाने यंदा दहीहंडी उत्सवाकरीता वसई विरार महापालिकेने घेतलेल्या एका निर्णयाने गोविंदा सुखावले आहेत. वसई विरार महापालिकेने आपल्या मनपा क्षेत्रातील सर्व गोविंदांचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या निर्णयाचे स्वागत केले असुन ठाण्यात देखील अनेक गोविंदा पथके आहेत, याच धर्तीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी एक पाऊल पुढे टाकत गोविंदा पथकातील बाळगोपाळांचे विमा उतरवावेत. अशी मागणी अविनाश जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे. किंबहुना, वसई विरारच का, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच महापालिकानी गोविंदाचे विमे उतरविले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.

जखमींचा खर्च शासनाने करावा - या आधी जायबंदी झालेल्या गोविंदाच्या औषधोपचाराचा सर्व खर्च शासनाने करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. दही हंडी हा सण आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असल्याने पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत या सणात खारीचा वाटा उचलावा असेही अविनाश जाधव म्हणाले.

हेही वाचा - Uday Samant : 'सहनशीलतेचा अंत पाहू नका...', उदय सामंतांचा शिवसैनिकांना धमकीवजा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.