ठाणे - आपल्या ओळखीच्या बड्या बँक अधिकाऱ्यावर विश्वास ठेऊन मोठी गुंतवणूक करणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महाग पडले. (LIC) पॉलिसीत गुंतवणूक करत मोठ्या परताव्याचे अमिष दाखवत भिवंडीतील एका कपडा व्यापाऱ्याला दीड कोटींचा गंडा घातला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्याने बँक अधिकारी आणि LIC एजन्ट्सच्या विश्वासहार्तेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
नऊ वर्षात दुप्पट परतावा देण्याचे अमिष
भिवंडीचे कपडा व्यापारी नरसय्या गजूला यांनी 2011 साली सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बांद्रा BKC शाखेतून घर गहाण ठेऊन दोन कोटींचे कर्ज घेतले. सदर शाखेचे ब्रँच मॅनेजर बाळकृष्ण अय्यर यांच्याशी गजूला यांचे चांगले संबंध प्रस्थापित होताच अय्यर यांनी LIC एजेंट असलेल्या आपल्या पत्नीकडून विमा उतरवण्याचा आग्रह धरला. (LIC agent swindled In Thane) केवळ नऊ वर्षात दुप्पट परतावा देण्याचे अमिष दाखवत स्वतः नरसाय्या गजूला, त्यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या प्रत्येकी पंचवीस लाखांचा म्हणजे एकूण एक कोटींचा विमा उतरवला.
बाळकृष्ण अय्यर आणि इतरांविरोधात फसवणूकीचा गुन्हा
या पॉलिसीची केवळ पावती देऊन इतर कागदपत्रे अय्यर यांनी स्वतःकडे ठेऊन दोन महिन्यांतच गजूला यांच्या नकळत पॉलिसी (LIC)कडे जमा केली व त्यातून गजूला यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम खोट्या सह्या करून एका खोट्या खात्यात वळती केली. याची कोणतीच माहिती नसलेल्या गजूला यांना जेव्हा हा सगळा गैरप्रकार कळला. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ ठाण्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत बँक मॅनेजर बाळकृष्ण अय्यर आणि इतरांविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदवला.
एलआयसी ने घेतली गंबीर दखल
फसवणुकीबाबत एलआयसीने गंभीर दखल घेतली असून हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे एलआयसीने पोलिसांना सांगितले आहे. एलआयसीवर भारतातील करोडो लोकांचा विश्वास आहे. तो विश्वास तसाच कायम राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोणाकोणाचा सहभाग शोधला जाणार आहे
या गुन्ह्यामध्ये एलआयसी कडून कर्ज काढून ते परस्पर दुसऱ्या खात्यावर वळून पैसे काढण्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे हा सगळा प्रकार करण्यासाठी पुन्हा कोणाचा या गुन्ह्यात समावेश आहे हे आता पोलिस तपासणार आहेत यासाठी कोणते कागदपत्र खोटी बनवलेली आहेत याचा देखील मागोवा पोलीस घेणार आहेत.
हेही वाचा - UP CM Yogi Adityanath Interview : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खास मुलाखत