ETV Bharat / city

Thane : किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात मारला मोठा दगड

Thane Crime News : ठाण्यात किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात टवाळखोरांनी दगड उचलून मारल्याची घटना ( large stone hit young man ) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा 4 आरोपी विरोधात दाखल केला आहे.

large stone hit the young man head in thane
किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात मारला मोठा दगड
author img

By

Published : Mar 5, 2022, 3:39 PM IST

Updated : Mar 5, 2022, 8:03 PM IST

ठाणे - किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात टवाळखोरांनी दगड उचलून मारल्याची ( large stone hit young man ) घटना ठाण्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा 4 आरोपी विरोधात दाखल केला आहे. या प्रकरणामधील एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव बाबू काळुराम वाघे, (वय 19 वर्षे ) असे आहे.

किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात मारला मोठा दगड

शिवीगाळ केल्याच्या वादातून घडला प्रकार -

गंभीर जखमी तरुण उमेश दत्ता पाटील, (वय 25 वर्षे, रा. चाविंद्रा, ता. भिवंडी) हा मित्रांसोबत कल्याण तालुक्यातील खडवली नदीवर आंघोळीसाठी 27 फेब्रुवारी रोजी गेला होता. त्यावेळी 4 अनोळखी तरुणांनी " तुम्ही कोठून आलात, तुमचे इकडे काय काम आहे" असे बोलून त्या आरोपी तरुणींनी शिवीगाळी केली. त्यावरून वाद होऊन एकाने उमेशला दगडात ढकलून दिले. तो खाली पडल्यावर दुसऱ्याने आरोपीने पकडून ठेवले असता एका आरोपीने जीव घेण्याच्या उद्देशाने जखमीचे डोक्यात मोठा दगड घालून गंभीर दुखापत केली. त्यानंतर अनोळखी आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले.

6 दिवसांनी गुन्हा दाखल -

गंभीर जखमी अवस्थेत उमेशला चाविंद्रा फाट्या जवळील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या मित्रांनी दाखल केले. दुसरीकडे या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल क्लिपवरून पोलिसांनी जखमीची सविस्तर माहिती घेऊन ४ अज्ञात आरोपी विरोधात ६ दिवसांनी म्हणजे (शुक्रवारी ) भादवी. कलम 307, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास शोध सुरु केला.

इतर आरोपीचा शोध सुरु -

गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे, पोलीस नाईक दर्शन सावळे यांनी परिसरात राहणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला. बाबू काळुराम वाघे, सुटका, जितेश उर्फ दिद्या गोंधळे, विशाल (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. खडवली असे आरोपीचे नावे निष्पन्न झाले. त्यापैकी दगड मारणारा मुख्य आरोपी बाबू काळुराम वाघे याला ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On Phone Taping Case : 'गोव्यातही शांतता! फोन टॅपिंग सुरु आहे'

Last Updated : Mar 5, 2022, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.