ETV Bharat / city

परिचारिका भरतीसाठी ठाणे मनपाबाहेर मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सचे पालन

author img

By

Published : May 27, 2020, 1:06 PM IST

इतर आरोग्य कर्मचारी भरतीसाठी पुरुष मंडळीदेशील आली होती. ठाणे महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयात नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी भरतीची जाहिरात दिली होती.

परिचारिका भरतीसाठी ठाणे मनपाबाहेर मोठी गर्दी

ठाणे - लॉकडाऊन काळात लोकं विनाकारण बाहेर पडू शकतात. मात्र, एखाद्या कोरोना रुग्णांची काळजी घ्या किंवा कोरोनाबाघित क्षेत्रात जाऊन डॉक्टर, नर्सेस, पोलिसांना मदत करा, असे सांगितल्यास मात्र लॉकडाऊनचा बहाणा देत लोकं पाठ फिरवतात. मात्र, ठाण्यात आज वेगळे चित्र पाहायला मिळाले. कोरोना महामारीच्या परिस्थितीत रुग्णांना सेवा देण्याकरता नर्सेसची कमतरता भासते. ती भरुन काढण्यासाठी ठाणे महानगरपालिकेबाहेर नर्सेसच्या भरतीसाठी महिलांनी एकच गर्दी केली होती.

परिचारिका भरतीसाठी ठाणे मनपाबाहेर मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सचे पालन

आश्चर्य म्हणजे इतर ठिकाणी अशा वेळेस सोशल डिस्टन्स पहायला मिळत नाही. मात्र, या महिला सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत उन्हात उभ्या होत्या. इतर आरोग्य कर्मचारी भरतीसाठी पुरुष मंडळीदेशील आली होती. ठाणे महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयात नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी भरतीची जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने महिलांनी या भरतीसाठी हजेरी लावली होती. या महामारीच्या परिस्थितीतही महिलांनी असा मोठा प्रतिसाद देणे म्हणजे खऱ्या अर्थाने या महिला कोरोना योद्धा होण्यास पात्र आहे हे स्पष्ट होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.