ETV Bharat / city

Ketki Chitale Controversy :...अन् तरीही केतकीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य कायम; आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - ठाणे न्यायालयाने सुनावले केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

कळवा पोलीस ( Kalwa police ) ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Ketki remanded in judicial custody for 14 days ) सुनावल्यानंतर आज ( मंगळवारी ) रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात देखील ठाणे सत्र न्यायालयाने ( Thane Sessions Court ) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर केतकीची रवानगी ( Ketki Chitale Controversy ) पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासून स्मितहास्य पाहायला मिळाले.

Ketki Chitale Controversy
Ketki Chitale Controversy
author img

By

Published : May 24, 2022, 5:47 PM IST

Updated : May 24, 2022, 5:58 PM IST

ठाणे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आणि नवी मुंबई रबाळे पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. कळवा पोलीस ( Kalwa police ) ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Ketki remanded in judicial custody for 14 days ) सुनावल्यानंतर आज ( मंगळवारी ) रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात देखील ठाणे सत्र न्यायालयाने ( Thane Sessions Court ) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर केतकीची रवानगी ( Ketki Chitale Controversy ) पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासून स्मितहास्य पाहायला मिळाले. आजही वैद्यकीय तपासणी दरम्यान केतकीच्या चेहऱ्यावर बिंधास्तपण आणि स्मितहास्य पाहायला मिळाले.

केतकीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणताना पोलीस आणि केतकीच्या वकीलाची प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण? : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केतकीचा शोध घेत असतांना केतकीला १४ मे रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथील तिच्या राहत्या घरातून तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर केतकीला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी तिची पोलीस कोठडी मागितल्याने ठाणे न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. केतकीची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर केले असता ठाणे न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात केतकीवर २०२० साली अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने १९ मे रोजी रबाळे पोलिसांनी ठाणे कारागृहातून केतकीचा ताबा घेतल. याप्रकरणी पोलीस तपास करण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र या प्रकरणात तरी केतकीला जामीन मिळेल असे तिला आणि तिच्या वकीलांना वाटत असतांना ठाणे सत्र न्यायालयाने आज केतकीला रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि तिची रवानगी पुन्हा थेट ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

...तरी केतकीच्या चेहऱ्यावरच हसू कायम : केतकी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत हसतांनाच पाहायला मिळाली. केतकीला कारागृहात नेण्याआधी ठाणे सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणीला नेले असतांना देखील केतकीच्या चेहऱ्यावरच हसू काही कमी झाले नाही. सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांकडून विचारण्यात येत असलेल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर केतकी हसून देतांना पाहायला मिळाली. वैद्यकीय तपासणी दरम्यान केतकीचा रक्तदाब तपासण्यात येत असतांना ९०. ६१ इतका होता. तेव्हा माझा रक्कदाब नेहमीच असा कमी आणि नॉर्मल असल्याचे केतकीने डॉक्टरांना सांगितले. आता कळवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या केतकीच्या जामीन अर्जावर येत्या २६ तारखेला सुनावणी आहे. रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात केतकीच्या वकिलांनी ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून आता ठाणे सत्र न्यायालय यावर काय सुनावणी करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On Sambhaji Raje : संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीबाबत संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

Last Updated : May 24, 2022, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.