ठाणे - महात्मा गांधी व नेहरुबद्दल आक्षेपार्ह विधानासह दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारे कल्याणमध्ये प्रवचन करणे कालीचरण बाबाला ( offensive remarks against Neharu Gandhi of Kalicharan Baba ) चांगलेच भोवले आहे. त्याच्याविरोधात कल्याणच्या कार्यक्रमात 15 दिवसांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( case against Kalicharan in Kolasewadi Police ) झाला आहे. त्यामुळे कालीचरण बाबाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिवप्रताप फाउंडेशन तर्फे “श्री शिव प्रतापदीन” कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज रोडवर 10 डिसेंबर 2021 रोजी स्वयंघोषित असलेल्या कालीचरण बाबाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन, साथी रोग कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून आयोजक मयुरेश धुमाळ, भैरव सिंग गुजर, शुभम गोवेकर, अमित घाडगे, अक्षय बर्गे, रूपेश परब, रोहित परब, निलेश माने, गणेश धुमाळ व इतर 10 ते 15 कार्यकर्ते यांच्या विरोधात ( Police case against Kalicharan program in Kalyan ) गुन्हा दाखल केला. पोलिसांचे नियम व आदेश डावलून कार्यक्रम केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला. मात्र, आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण बाबावर त्यावेळी कोणताही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नव्हता.
कल्याणातील कार्यक्रमाचे व्हिडीओ पोलिसांच्या हाती
कल्याणच्या कार्यक्रमात कालीचरण बाबाने महात्मा गांधींसह पंडित नेहरू यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. तर महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा जयजयकारही केला होता. याप्रकरणी छत्तीसगडच्या पोलिसांनी कालीचरण महाराजला ( Kalicharan Maharaj arrest by Chattisgarh Police ) अटक केली. त्यानंतर कल्याणच्या कार्यक्रमातील कालीचरण बाबाचे आणखी काही वादग्रस्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती आले आहेत. त्यातच समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणे आहेत. सध्या कालीचरण बाबा पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. कल्याणातही महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याबद्दल बाबाने अनुउद्गार काढले होते.
हेही वाचा-Kalicharan Maharaj Custody Of Pune Police : कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात
कल्याण पोलीसही घेणार बाबाचा ताबा..
कालीचरण बाबाचे कल्याणमध्ये येऊन केलेले चिथावणीखोर भाषण हे दोन धर्मात तेढ निर्माण आहे. त्यामुळे भविष्यात गृहयुद्ध भडकवणारे ठरू शकते. त्यामुळे अशा भाषणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा तक्रादार नोवेल साळवे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी 15 दिवसांनी कालिचरण बाबावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तर पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कालिचरण बाबाचा ताबा घेण्यासाठी कल्याण पोलिसांचे एक पथक पुणे येथे रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.