ठाणे - महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलेल्या कालीचरण बाबाला अटक केल्यानंतर आज ठाणे पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी त्याचे समर्थक मोठ्या प्रमाणात न्यायालयाच्या बाहेर जमा होत घोषणाबाजीही केली. कालीचरण बाबाला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रायपूर जेलमध्ये रवानगी -
ठाणे न्यायालयाने बाबा कालीचरण याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. तसेच कालीचरण बाबाने आज जामीन अर्ज दाखल केला आहे. जमीन अर्जावर सोमवारी ठाणे न्यायालयात निर्णय होणार आहे. ठाणे कोर्टने कालीचरण बाबाला 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे बाबा कालीचरणची रायपूर जेलमध्ये रवानगी केली आहे.
मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची तक्रार
महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरूवारी कालिचरण याला राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारी नंतर ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली परंतु न्यायालयाने त्यांची न्यायालयान कोठडीत रवानगी केली. कालिचरण याच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर कार्यकर्त्यांनी जय श्री राम च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.