मुंबई - किरीट सोमैया यांना आता सध्या काहीच काम नाही. त्यामुळे ते जे काय बोलतायत ते बोलण्याचं तरी काम त्यांना करूद्या, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमैया यांच्यावर केली आहे.
हेही वाचा... 'भारताची अर्थव्यवस्था एकट्या नरेंद्र मोदींनी संपवली आणि ते स्वतःला देशभक्त म्हणवतात!'
किरीट सोमैया सध्या जे करतायत ते काम त्यांना करू द्या. आधीच भाजपने त्यांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे त्यांना तसेही काही काम नाही. तर दुसरीकडे भाजप हा पक्ष नेहमीच हिंदू मुस्लीम यांच्याबाबत बोलतो. त्यांच्यात द्वेष निर्माण करत आहे. एकीकडे देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. महागाई, बेरोजगारी यांसारखे अनेक मुद्दे असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे भाजपनेच तिकीट कापलेले किरीट सोमैया यांनी मात्र बांगलादेशी घुसखोरीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. हे पत्र म्हणजे किरीट सोमैया यांना काहीच काम उरले नसल्याचा टोला राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
हेही वाचा... मुंबई - कांद्याचे दर चढेच राहिले तर रेस्टॉरंटमधील मेन्यू महागणार; हॉटेल संघटनेची भूमिका