ETV Bharat / city

'ओ.....शेठ, तुम्ही नादच केलाय थेट' या गाण्यावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल - ओ...शेठ तुम्ही नादच केलाय थेठ हे गाण व्हायरल

भाजपचे भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांना मोदी सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 'पंचायत राज' या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यानंतर कुटुंबासह, नातेवाई आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. या आनंदाच्या भरात नातेवाईकांसह कार्यकर्त्यांनी नुकते व्हायरल झालेले 'ओ....शेठ' हे गाण्यावर कपिल पाटील यांचे काही व्हिडीवो, फोटो घेऊन एक व्हिडीओ बनवला आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील कुटुंबासह

author img

By

Published : Aug 2, 2021, 8:09 PM IST

ठाणे - मोदी सरकरच्या मंत्री मंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये भाजपचे भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांना 'पंचायत राज' या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. या निवडीनंतर खासदार कपिल पाटल्यांच्या नातेवाईकांसह समर्थकांनी कपिल पाटील यांचे मोठ्या जल्लोशात स्वागत केले आहे. मात्र, हे समर्थक या स्वागतावरच थांबले नाहीत, त्यांनी नुकतेच मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले 'ओ... शेठ' हे गाणे वापरून एक व्हिडीओ केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

'ओ.....शेठ, तुम्ही नादच केलाय थेट' या गाण्यावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल

पाटील यांची १९८८ पासून राजकीय प्रवासाला सुरुवात

कपिल पाटील यांचा सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री असा आजपर्यंतचा राजकीय प्रवास राहिला आहे. या प्रवासात त्यांना दोनवेळा पक्षांतर करावे लागले. १९८८ ला पाटिल यांनी काँगेसमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली आहे. त्यावेळी पहिल्यांदा ग्रामपंचातच्या निवडणुकीत सहभाग घेऊन गावातील पदवीधर तरुण म्हणून पाटील यांनी थेट सरपंचपदी मजल मारली. त्यांनतर पंचायत समिती सभापती, तर १९९९ ला कॉग्रेसला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भिवंडी तालुका अध्यक्ष म्हणून सुरुवात केली. त्यानंतर ते १४ वर्ष राष्ट्रवादीमध्ये राहिले. त्यामध्ये त्यांनी ठाणे ग्रामीण भागात संपर्क वाढवला. यामुळे त्यांना फायदा होत ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष व ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाची धुरा संभाळली. याच दरम्यान, त्यांच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष काळात यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत २०१०- २०११ आणि २०१२ या दोन वर्षात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त झाला आहे.

२०१४ साली भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीत असताना पक्षातील स्थानिक पातळीवरील अंतर्गत वादाला कंटाळून पाटील यांनी 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोकसभेला पाटील मोठ्या मताधिक्याने भिवंडी लोकसभा निवणुकीत विजयी झाले. त्यांनतर दुसऱ्यांदा २०१९ लाही पाटील लोकसभेवर निवडूण गेले. खासदारकीच्या काळात त्यांनी प्रत्येक संसद अधिवेशनात मतदार संघातल्या नागरी प्रश्नांना वाचा फोडली. खास करून त्यांचा जिल्हा परिषदेत पंचायत राज विषयी असलेल्या खास अभ्यासामुळे त्यांना केंद्रात पंचायत राज खात्याची जबाबदारी देण्यात आली असावी अशी माहिती आहे.

'कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी आपल्या आनंदाच्या भरात हा व्हिडीओ बनवला'

पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यातील खासदाराला केंद्रात मंत्रीपद मिळाले. त्यातही स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी समाजाला मिळाल्याने, सहाजिकच आहे कार्यकर्त्यामध्ये, समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असणार. तसेच, हाच आनंद कुटुंबासह नातेवाईकांमध्येही आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी आपल्या आनंदाच्या भरात हा व्हिडीओ बनवला असेल, अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी या व्हिडीओवर दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.