ETV Bharat / city

Thane Police : ठाणे पोलिसांची वेबसाईट तपास सायबर सेलकडून एटीएसकडे ? - वेबसाईट हॅक

सायबर गुन्हेगारांनी चक्क ठाणे पोलिसांची ( Thane Police ) वेबसाईट हॅक ( Website hacked ) केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ झाली. ठाणे सायबर विभागासह ( Cyber Cell Department ) गुन्हे शाखेचे 10 पथक या हॅकरचा शोध घेत होते. दरम्यान आता हा तपास एटीएसकडे ( ATS ) सोपविण्यात आल्याची पोलीस ( Police ) सूत्रांची माहिती आहे.

पोलीस आयुक्तालय ठाणे
पोलीस आयुक्तालय ठाणे
author img

By

Published : Jul 9, 2022, 6:59 AM IST

ठाणे - ठाणे पोलीस ( Thane Police ) आयुक्तालयाची ( Thane Police Commissioner ) वेबसाईट 6 तास हॅक केल्याची घटना १४ जून २०२२ रोजी घडली होती. सदर गुन्ह्याचा तपास हा सायबर सेल विभागाद्वारे ( Cyber Cell Department ) करण्यात येत होता. दरम्यान आता हा तपास एटीएसकडे ( ATS ) सोपविण्यात आल्याची पोलीस ( Police ) सूत्रांची माहिती आहे.

ठाणे पोलिसांची वेबसाईट ही हॅक करण्यात आली - नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समुदायाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने भारतात आणि मुस्लिम राष्ट्रात असंतोष पसरला होता. या घटनेनंतर 14 जूनला नुपूर शर्मा हिच्यावर कारवाई होत नसल्याने ठाणे पोलिसांची वेबसाईट ही हॅक करण्यात आली होती. तब्बल 6 तासानंतर हाक केलेली वेबसाईट ही सायबर सेलने रिकव्हर केली होती. हाक केलेल्या वेबसाईट उघडताच हॅकर्सने संदेश दिला होता. या प्रकारानंतर वेबसाईट रिकव्हर करून, पूर्ववत केल्यानंतर अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या हॅकर्सचा शोध सायबर सेल करत असतानाच सदरच्या गुन्ह्याचा तपास एटीएस पथक करणार आहे. प्रकरण एटीएसकडे सोपविण्यात आले आहे. याच्या मागचे कारण समजू शकले नाही.

आंतरराष्ट्रीय संबंध - हा गुन्हा करण्यामागे भारताबाहेरील काही शक्ती असल्याचे सुरुवातीच्या पोलीस तपासात निष्पन्न झाल्यामुळे हा गुन्हा एटीएसकडे दिला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सायबर पोलिसांना असलेले अधिकार आणि एटीएसला असलेल्या अधिकारांमध्ये फरक असून पोलिसांची वेबसाईट हॅक करणे हा अतिरेकी प्रयास असल्याचे तज्ञांनी या आधीच सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा एटीएस करत आहे.

पोलिसांची एकच धावपळ - अज्ञात सायबर गुन्हेगारांनी चक्क ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ झाली. ठाणे सायबर विभागासह गुन्हे शाखेचे 10 पथक या हॅकरचा शोध घेत असून, वेबसाईट पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

१४ जून २०२२ रोजी सायबर हल्ला - हा सायबर हल्ला १४ जून २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास झाला असून, रात्रीपासून ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या वेबसाईटवरची सगळी माहिती गायब झाली आहे. या वेबसाईटवर ठाणे पोलीस अधिकार्‍यांची माहिती तसेच त्यांचे मोबाईल नंबर्सही होते. आता मात्र या वेबासाईटवर सांकेतिक भाषा दिसत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली असून, अनेक सायबर तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. सायबर पोलिसांसह गुन्हे शाखेची तब्बल 10 पथके तपास करत होते.

हेही वाचा - सुनेला घराबाहेर काढणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना सत्र न्यायालयाने फटकारले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.