ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात पाणी टंचाई सुरू आहे. यातच काही परीसरात गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आले, तर काही ठीकानी नळावाटे येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात किडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या खळबळजनक घटनेमुळे नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ करते कि काय ? असा सवाल करदाते नागरिकांकडून विचरला जात आहे.
नळावाटे पिण्याच्या पाण्यात पाईपलाईनमध्ये किडे आढळून आल्याची घटना कल्याण पूर्वेतील वालधुनी आणि अशोकनगर परिसरातील चाळीत घडली आहे. कल्याणमधील अशोकनगर भागातील नागरिकांना ८ दिवसापासून त्यांच्या नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. याबाबत त्यांनी विभागातील पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली. त्यावेळी पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, अशोकनगर परिसरातील नागरिकांच्या नळातुन पाण्यासोबतच किडे आढळून आल्याने याबाबत स्थानिक नागरिकांनी पुन्हा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याना तक्रारी केल्या. मात्र, त्यांनाही पाण्यात किडे नेमके कुठून येतात. या किडयांचे कोड उलगडले नाही. त्यामुळे केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचा बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा जनतेच्या आरोग्याशी खेळ करत आहे का ? याला जबाबदार कोण ? का केडीएमसीने केवळ टॅक्स गोळा करण्यासाठी दुकान उघडले आहे का ? याना जाब कोण विचारणार? असे अनेक प्रश्न उपस्थित करून अशोकनगर मधील नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापलिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा बुरखा फाडून नागरिकांच्या जीवाशी खेळ बंद करण्याची मागणी केली आहे.