ETV Bharat / city

Flag Distribution Center in Thane: ठाणे ग्रामीण भागातील ध्वज वितरण केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन - Har Ghar Tiranga Campaign in Thane

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Amrit Mahotsav of Independence in Thane ) आयोजित घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिल्या ध्वज वितरण केंद्राचे उद्घाटन ( Inauguration of Flag Distribution Center in Thane Rural Area ) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of Flag Distribution Center in Thane Rural Area
ठाणे ग्रामीण भागातील ध्वज वितरण केंद्राचे उद्‌घाटन
author img

By

Published : Aug 6, 2022, 8:27 PM IST

ठाणे: हर घर तिरंगा अभियानामध्ये ( Har Ghar Tiranga Campaign in Thane ) जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील ( Thane ZP Chairperson Pushpa Patil ) यांनी केले. आपल्या देशाची शान असलेल्या राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल याची प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Amrit Mahotsav of Independence in Thane ) आयोजित घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिल्या ध्वज वितरण केंद्राचे उद्घाटन ( Inauguration of Flag Distribution Center in Thane Rural Area ) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, काल्हेरच्या सरपंच अक्षता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Distinguished women present at the flag distribution center
ध्वज वितरण केंद्रात उपस्थित मान्यवर महिला

नव्या पिढीसाठी स्वराज्य महोत्सव उपयुक्त ठरेल- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर - जिल्हाधिकारी नार्वेकर यावेळी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान त्यांचे बलिदान यांचे स्मरण व्हावे नव्या पिढीला त्यांच्या योगदानाविषयी माहिती मिळावी यासाठी स्वराज्य महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. तो यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. आपला राष्ट्रध्वज तिरंगा यशाच्या स्वाभिमानाचे प्रगतीचे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण देणारा आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवताना त्याचा ध्वज संहितेनुसार मान राखला जाईल याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Distinguished person present at the flag distribution center
ध्वज वितरण केंद्रात उपस्थित मान्यवर पुरुष

नागरिकांसाठी ध्वज संहितेत बदल- केंद्र शासनातर्फे घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी ध्वज संहितेत थोडा बदल करण्यात आला असून १३ ते १५ ऑगस्ट या काळात घरांवर रात्री देखील राष्ट्रध्वज फडकविण्याची मुभा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय कार्यालयांमध्ये मात्र नेहमीप्रमाणे सायंकाळी राष्ट्रध्वज उतरविण्यात येईल, असे ते म्हणाले. काल्हेर येथे आज झालेल्या ध्वज वितरण केंद्राच्या शुभारंभाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अमृत महोत्सवातील उपक्रमांना सुरुवात झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दागिना जपून ठेवतो तसा तिरंगा जपून ठेवावा- घरोघरी तिरंगा उपक्रमानंतर राष्ट्रध्वजाचा मान राखताना आपण एखादा दागिना जपून ठेवतो तसा तिरंगा जपून ठेवावा. त्याची शान कायम राखण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सातपुते यांनी यावेळी सांगितले. जिल्हयात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ८० हजार विद्यार्थी तिरंगादूत म्हणून नेमण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राष्ट्रीय सण असून सर्वांनी तो उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन डॉ. सातपुते यांनी केले.

स्वराज्य महोत्सवानिमित्त स्पर्धा - यावेळी उपाध्यक्ष पवार, शिसोदे यांनी मनोगत व्यक्त केले. काल्हेर ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. स्वराज्य महोत्सवानिमित्त आयोजित वक्तृत्व, चित्रकला, निबंध अशा विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण, महिलांना प्रशिक्षण आदी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. याठिकाणी करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर जाऊन मान्यवरांनी सेल्फी घेतली. हर घर तिरंगा महोत्सव उपक्रमाच्या माध्यमातून दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी मिळाली आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हा महोत्सव यशस्वी करावा, असे काल्हेरच्या सरपंच अक्षता पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Nashik Fire : नाशिकमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; घरात अनेक लोक अडकल्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.