ठाणे - मुंब्रा पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दुकानाच्या मालमत्तेच्या वादातून बाप आणि मुलाच्या भांडणात लहान मुलगा मनोज चौरासिया याने पोलिसांसमोर स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. अत्यवस्थ मनोज चौरसिया याला केइएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
हेही वाचा - Thane Crime News : भावजयच्या साडे सहा लाखांच्या दागिन्यांवर नणंदने मारला डल्ला
याबाबतची हकीकत अशी की, मुंब्रा परिसरात अर्जुन चौरसिया यांचे दुकान आहे. या दुकानाच्या कब्जाबाबत अर्जुन चौरसिया आणि दोन मुले अशोक आणि मनोज यांच्यात वाद होता. सदर प्रकरणी अर्जुन चौरसिया याने काही लोकांना हाताशी धरून दुकानाचा ताबा दुसऱ्याला दिला. वाद हा सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश आंधळे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कायदेशीर कार्यवाही कारून प्रकरण दिवाणी न्यायलयात पाठविले होते. दिवाणी न्यायलयात प्रकरण सुरू आहे. दरम्यान पिता अर्जुन आणि लहान मुलगा यांच्यात पुन्हा दुकानाच्या कब्जाबाबत वाद शनिवारी उफाळून आला. दरम्यान लहान मुलगा मनोज याने दुकानात घुसून तोडफोड करीत दुकानात आलेल्या पोलिसांसमोरच स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मनोज हा जास्त भाजला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला मुंबईच्या केइएम रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर भाजलेल्या अवस्थेत असलेल्या मनोजने रुग्णवाहिकेत बसून उपचारासाठी जाण्यास नकार दिला. मात्र जबरदस्तीने त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पिता-पुत्र यांचा वाद पूर्वीच झाला होता. असाच प्रयत्न करण्याचा प्रकार हा मनोजने केला होता, मात्र त्याला स्थानिकांनी आणि पोलिसांनी समजावले आणि प्रकरण हे न्यायालयात गेले असून त्यावर लवकर निर्णय आला पाहिजे असे मत स्थानिकांनी वक्त केले. शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि ही घटना पोलिसांसमोरच घडली असे असले तरी बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
हा सगळा वाद वाढण्यामागे घरघुती कारण आहे. या आधी देखील अशाच प्रकारे कुटुंबीयांची भांडने आम्ही पाहिली आहेत. या आधी आम्ही त्या कुटुंबातील लोकांना न्यायालयात जाण्याचे आवाहन केले आहे. जर कायद्याची पायमल्ली होत असेल तर आम्ही हस्तक्षेप करू, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यानी दिली.
हेही वाचा - Nupur Sharma Controversial Case : नुपूर शर्माला भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स जारी.....