ETV Bharat / city

ठाण्यात महिला सहाय्यक आयुक्तावर फेरीवाल्याचा जिवघेणा हल्ला, बोटे छाटली, बघा VIDEO

author img

By

Published : Aug 30, 2021, 10:02 PM IST

Updated : Aug 31, 2021, 1:16 PM IST

ठाण्यात एकीकडे अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा - मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

hawkers attack Assistant Commissioner Thane
सहाय्यक आयुक्त हल्ला फेरीवाले ठाणे

ठाणे - ठाण्यात एकीकडे अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हातावरील बोटांवर चाकूने हल्ला झाला असून त्यांची बोटे छाटल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पिंपळे यांना तत्काळ घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. दरम्यान, अमरजीत यादव असे या हल्लेखोर भाजी विक्रेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे ठाण्यातील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - ठाणे-दिवा पाचव्या -सहाव्या मार्गिका डिसेंबर अखेरपर्यत होणार पूर्ण

गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे मनपाची कारवाई -

ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे, तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत प्रभाग समितीनिहाय अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर धडक कारवाई सुरू असून, शहरात विविध ठिकाणी कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. दरम्यान, घोडबंदर रोड येथे सोमवारी संध्याकाळी अशीच कारवाई सुरू असताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे याच्यावर अमरजीत यादव या भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात कल्पिता पिपळे यांची तीन बोटे छाटली गेली असून गंभीर दुखापत झाली आहे. तर, सुरक्षारक्षकाच्या ऐका बोटाला दुखापत झाली आहे.

हल्लेखोराला अटक -

अमरजीत यादव या हल्लेखोर भाजी विक्रेत्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून या हल्ल्यामुळे ठाणे महापलिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा हल्ला एवढा भयावह होता की घटनास्थळी असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी देखील मनात घडकी भरली होती, तर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी दुरूनच फोटो, व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. हल्ल्यामुळे फेरीवाल्यांचा मुजोरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.

या आधीही झाले आहेत हल्ले -

महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर अशाप्रकारचे हल्ले होण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधी देखील अनेक अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले झाले आहेत. याचे मुख्य कारण छोट्या अधिकाऱ्यांकडून घेतले जाणारे हफ्ते देऊन देखील अशा प्रकारची कारवाई होणे हे फेरीवाल्यांच्या जिव्हारी लागतात आणि म्हणूनच अशा वैफल्यातून हे हल्ले होत असल्याचे अनेक फेरीवाल्यांनी सांगितले. हल्लेखोराला आम्ही ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली.

प्रतिक्रिया

ही घटना निंदनिय -

ही घटना निंदनीय आहे. याबाबत कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

Last Updated : Aug 31, 2021, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.