ETV Bharat / city

अंबरनाथमध्ये २२ वर्षीय तरुणाची पाच हल्लेखारांनी धारदार शस्त्राने केली निर्घृण हत्या - 22-year-old youth was brutally killed news

अंबरनाथ शहरात पूर्वेच्या शिव मंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा एका तरुणाची काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

हल्ल्यात मृत्यू झालेला तरुण भाविक शिंदे
हल्ल्यात मृत्यू झालेला तरुण भाविक शिंदे
author img

By

Published : Jul 7, 2021, 5:03 PM IST

ठाणे - अंबरनाथ शहरातील पूर्व भागात एका २२ वर्षीय तरुणाची पाच हल्लेखारांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संशयीतांवर गुन्हा दखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास घटनेचा तपास सुरु केला आहे. भाविक शिंदे (वय, २२ रा. उल्हासनगर, कँम्प ४ ब्राम्हणपाडा) असे निर्घृणपणे हत्या झालेल्या मृत तरुणाचे नाव आहे. तर, सतीश उर्फ सत्या कांबळे, ओंकार बारस्कर, सचिन मोरे, रोहित जगदाळे, अमित सिंग उर्फ आकाश असे हल्लेखोर आरोपींचे नावे आहेत.

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज

भाविक शिंदे येथील अंबरनाथ पूर्वेच्या शिव मंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा आपल्या मित्रांसोबत आला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने भाविक याच्या मानेवर, छातीवर, हातावर वार करुन त्याची जागीच हत्या केली. यामध्ये सतीश उर्फ सत्या कांबळे, ओंकार बारस्कर, सचिन मोरे, रोहित जगदाळे, अमित सिंग उर्फ आकाश अशी हल्ला करणारांची नावे आहेत. दरम्यान, या हल्लेखोरांसोबत भाविकचे काही कारणांवरून पूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून हा लह्हा झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आरोपी फरार

घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दीली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून भाविकचा मृतदेह उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.