ETV Bharat / city

डोंबिवलीत 28 लाखांच्या बनावट दारूसह ट्रक-टेम्पो जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कल्याण शीळ मार्गावर असलेल्या आर्या लॉजच्या समोरच एका टेम्पोमध्ये विदेशी बनावट दारूच्या बाटल्या होत्या. विविध कंपनीच्या 1 लाख 80 हजार रुपयांच्या व्हिस्कीच्या बाटल्या आणि 1 लाख 65 हजारांचा टेम्पो असा 3 लाख 45 मुद्देमाल उत्पादन शुल्काने जप्त केला आहे.

बनावट दारू
बनावट दारू
author img

By

Published : Nov 23, 2020, 3:47 PM IST

Updated : Nov 23, 2020, 4:38 PM IST

ठाणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाने बनावट दारू प्रकणात धडक कारवाई केली आहे. गोव्यातील विविध विदेशी दारूचा बनावट साठा घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रकसह 28 लाख 78 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. तर एका तस्कराला अटक केली आहे. दीपक तेजराव बोरडे (26) असे अटक केलेल्या दारू तस्कराचे नाव आहे.

कल्याण शीळ रस्त्यावरून अवैधरित्या बनावट विदेशी मद्याची तस्करी केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कल्याण - शीळ मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला सापळा रचला. कल्याण शीळ मार्गावर असलेल्या आर्या लॉजच्या समोरच एका टेम्पोमध्ये विदेशी बनावट दारूच्या बाटल्या होत्या. विविध कंपनीच्या 1 लाख 80 हजार रुपयांच्या व्हिस्कीच्या बाटल्या आणि 1 लाख 65 हजारांचा टेम्पो असा 3 लाख 45 मुद्देमाल उत्पादन शुल्काने जप्त केला आहे. यावेळी पथकाने दीपक बोरडेकडे चौकशी केली असता त्याने उसरघरमधून विदेशी दारूचा साठा भरल्याचे सांगितले.

डोंबिवलीत 28 लाखांच्या बनावट दारूसह ट्रक-टेम्पो जप्त

हेही वाचा-रिक्षाचालकाचा शोध लागला अन् महिलेचा जीव भांड्यात पडला...

ट्रकमधून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

उसरघर गावाजवळ एका विटभट्टीनजीक उभ्या असलेल्या ट्रकवरची ताडपत्री काढण्यात आली. ट्रकमध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या व बाटल्यावर लावण्यात येणारे बनावट लेबल असा 18 लाख 21 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर ट्रक व टेम्पोसह 28 लाख 78 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त आला आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, विदेशी दारूची तस्करी करणारा म्होरक्या फरार झाला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्याचा कसून शोध घेत असल्याचे डोंबिवली विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी माहिती दिली.

हेही वाचा-सिंदखेडराजा तालुक्यात पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक; २ पिस्तूल व मॅग्झिन जप्त

Last Updated : Nov 23, 2020, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.