ETV Bharat / city

Thane Traffic Police : वाहतुकीचे नियम मोडले तर, जनजागृती करा अन्यथा फाईन भरा.. वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम - ठाण्यात वाहतूक नियम मोडले

ठाणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ( Traffic Rules Breach In Thane ) वाहनचालकांची संख्या मोठी आहे. अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने ( Thane Police Traffic Branch ) अनोखा उपक्रम राबविला. वाहतुकीचे नियम मोडल्यास रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती ( Traffic Rules Awareness ) करावी अथवा दंड ( Fine For Traffic Rule Breach ) भरावा, अशी शक्कल लढविण्यात आली.

Traffic Rules Breach In Thane
वाहतुकीचे नियम मोडले तर, जनजागृती करा
author img

By

Published : Apr 22, 2022, 8:40 PM IST

ठाणे : ठाणे वाहतूक शाखेच्यावतीने ( Thane Police Traffic Branch ) शुक्रवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन ( Traffic Rules Breach In Thane ) केलेल्या वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आलेे. हा अनोखा उपक्रम करताना पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांना जनजागृतीचे पोस्टर 15 मिनिटे ( Traffic Rules Awareness ) पकडा, अन्यथा दंड भरा ( Fine For Traffic Rule Breach ) असा अनोखा पवित्रा घेतला होता. शुक्रवारच्या समुपदेशन मोहिमेत तब्बल १ हजार ४३६ वाहन चालकांचे सामऊपदेशन करत वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी केली.

समुपदेशनाची विशेष मोहीम : ठाण्यात रोड अपघातात वाढ झालेली असून, अपघातात मृत्यूचा आकडाही वाढला आहे. याला आळा घालण्यासाठी वाहनचालकांच्या समुपदेशनाची विशेष मोहीम शुक्रवारी ठाणे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी राबविली. या मोहिमेत तब्बल दीड हजाराच्या आसपास वाहनचालकांचे समुपदेशन करून सिंग्नल जम्पिंग, हेल्मेट वापर, सीटबेल्ट वापराबाबत फायदे आणि सुरक्षा याबाबत समुपदेशन करण्यात आले. ठाणे वाहतूक शाखेने समुपदेशन केलेल्या वाहनचालकांची संख्या १ हजार ४३६ एवढी आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १८ ठिकाणी शुक्रवारी समुपदेशनाची विशेष मोहीम राबविण्यात आली.

वाहतुकीचे नियम मोडले तर, जनजागृती करा अन्यथा फाईन भरा.. वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम

वाहतूक विभाग समुपदेशन केलेल्या वाहनांची संख्या
ठाणेनगर ८३
कोपरी ७८
नौपाडा ८४
वागळे ५०
कापूरबावडी ९५
कासारवडवली ६३
राबोडी ३३
कळवा ९४
मुंब्रा ९७
भिवंडी ४०
नारपोली ७६
कोनगाव ८२
कल्याण ७५
डोंबवली ६०
कोळसेवाडी १०४
विठ्ठलवाडी ८७
उल्हासनगर ११०
अंबरनाथ १२५

वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सिंग्नल जम्पिंग करणाऱ्या, सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर न करणाऱ्या विभागात अंबरनाथ प्रथम क्रमांकावर आहे. तर उल्हासनगर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कोळसेवाडी विभाग असल्याचे वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

नागरिकांनी केले स्वागत : कायदा मोडल्यावर दंड न आकारता जनजागृतीची मिळालेली संधी अनेकांनी स्वीकारली. पण ज्यांना घाई होती अशांनी दंड भरणे पसंत केले आहे. परंतु नागरिकांनी या पद्धतीचे स्वागत केले आहे. कारण चुकून कायदा मोडला असेल तर त्यांना आपली चूक सुधारण्याची संधी मिळाली आहे. अशाचप्रकारे पुढे देखील कारवाया सुरू राहाव्यात असे नागरिकांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.