ETV Bharat / city

Heavy Vehicle In Bhiwandi City : बंदी असतानाही भिवंडी शहरात फिरत आहेत अवजड वाहने; पोलिसांचे दुर्लक्ष - भिवंडी शहरात फिरत आहेत अवजड वाहने

भिवंडी शहरात अवजड वाहनांना ( Heavy Vehicle Ban In Bhiwandi City ) प्रवेश बंदी आहे. तरी देखील शहराच्या प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहने फिरतान दिसून येत आहे. बंदी असतानाही जर अवजड वाहने रस्त्यावर दिसून येत असतील तर या वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना शहरात प्रवेश दिला जातो की काय, असे चित्र आहे.

Breaking News
author img

By

Published : Jan 1, 2022, 8:45 PM IST

ठाणे - भिवंडी शहरात अवजड वाहनांना ( Heavy Vehicle Ban In Bhiwandi City ) प्रवेश बंदी आहे. तरी देखील शहराच्या प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहने फिरतान दिसून येत आहे. बंदी असतानाही जर अवजड वाहने रस्त्यावर दिसून येत असतील तर या वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना शहरात प्रवेश दिला जातो की काय, असे चित्र आहे. या प्रकारमुळे वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी -

भिवंडी शहरात विविध प्रमुख रस्त्यावर सिमेंटचे रस्ते तयार करण्याचे काम गेल्या ३ वर्षापासून सुरु आहे. त्यातच ठाणे-भिवंडी-कल्याण अशा मेट्रो मार्गाचे कामही सुरु आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय शहर व ग्रामीण पट्यात मोठं-मोठी गोदामे असल्याने शहरातील रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ नेहमीच असल्याचे चित्र पावयास मिळते. अनेक वेळा विविध पक्ष व सामाजिक संघटनानी वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आंदोलन, मोर्चे, उपोषणही केले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याचे जाहीर करत तसे फलकही शहरातील येणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आले. तरीदेखील आजही विविध मार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र कायम आहे. असे असतानाही वाहतूक पोलीस आणि त्यांच्या मदतीला असलेली वार्डन वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे सोडून अवजड वाहनचालकांकडून चिरीमिरी घेत असल्याचे दिसून आले. विशेषतः शहराच्या मध्यभागी असलेल्या स्वर्गीय राजीव गांधी चौकात अवजड वाहन चालकांकडून वसुली केली जात असल्याचे दिसून आले आहे. शिवाय गुजराथ व नाशिकहून भिवंडीत दाखल होणाऱ्या वाहनांकडून आदी नदी नाका आणि वंजारपट्टी नाका येथे चिरीमिरी घेऊन शहरात अवजड वहाने सोडली जात आहे.

२६५ वाहनांचालकांवर पोलिसांची कारवाई -

नववर्षानिमित्त भिवंडी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी दरवर्षीप्रमाणे आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपासून शहरातील ठीकठिकाणी प्रमुख रस्त्यावर नाकाबंदी करून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहनांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर होती. शहरात अनेक ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एकाच रात्रीत २६५ वाहनचालकांवर कारवाई करत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांचे चलनही कापण्यात आले. एवढेच नव्हे तर दारू पिऊन पकडलेल्या ७१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.

हेही वाचा - मुंबईकरांना राज्य सरकारकडून नववर्षाचं मोठं गिफ्ट.. 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.