ठाणे - भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगाच्या सुनावण्या मुंबई, पुण्यात होत होत्या. मात्र, कोविडमुळे जागेच्या अभावाने सुनावणीत अडचण झाली. सुनावणीसाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी वारंवार केल्यानंतरही जागा न मिळाल्याने अखेर भीमा - कोरेगाव प्रकरणाची सुनावणी ठप्प झाल्याची माहिती आयोगाच्या सुनावणीत सहभागी असलेल्या आशिष सातपुते यांनी दिली.
हेही वाचा - CCTV : भिवंडी मेरे बाप की है म्हणत टोळक्याचा हैदोस; तरुणाला बेदम मारहाण
राज्य शासनाने भीमा - कोरेगाव प्रकरणी आयोगाची स्थापना केली. या प्रकरणाची सुनावणी मुंबई तर, कधी पुणे येथे आयोगाच्या कार्यालयात करण्यात येत होती. दरम्यान कोविड काळात आयोगाची जागा कमी पडत होती. तर, दुसरीकडे कोविडमुळे नियमांचे पालन करणे आणि सुनावणी करणे कठीण होते. त्यासाठी राज्य शासनाला आयोगाच्या माध्यमातून मुंबईत नवी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आणि मागणी करण्यात आली होती. आयोगाने गृहमंत्रालयाला निवेदनाद्वारे कळविले होते, मात्र आजपर्यंत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही. जागेच्या मागणीची राज्य शासन दाखल घेत नव्हते. अखेर ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पुन्हा पत्र देऊन भीमा - कोरेगाव प्रकरणाची सुनावणी स्थगित केल्याचे सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती वकील आशिष सातपुते यांनी दिली.
हेही वाचा - पालिकेच्या निधीवरून ठेकेदार व तक्रादार महिलांमध्ये हाणामारी; प्रकार सीसीटीव्हीत कैद