ETV Bharat / city

महिलेला मारहाण करण्याच्या वादातून अल्पवयीन मित्राने केली मित्राचीच हत्या; भिवंडीतील थरारक घटना - he murdered his friend

दोघे मित्र सोबत जात असताना एका मित्राने विनाकारण महिलेला मारहाण केली. विनाकारण त्या महिलेला मारहाण का करतोस असे दुसऱ्या मित्राने विचारले असता त्याचाच छातीत चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे.

शांतीनगर पोलीस ठाणे
author img

By

Published : Jul 24, 2019, 10:04 PM IST

ठाणे - एका महिलेला मारहाण करण्याच्या वादातून रागावलेल्या अल्पवयीन मित्रानेच अल्पवयीन मित्राच्या छातीत चाकू भोसकला. व त्याचा भररस्त्यात खून केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील निजामी हॉटेल समोर घडली.

नफीज तोतला (वय 17 रा. शांतीनगर) असे हत्या करणाऱ्या आरोपी मित्राचे नाव आहे. तर अतिक जमील अन्सारी (वय 17 रा. न्यू आजाद नगर) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी हे दोघे मित्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास भिवंडीतील पाईपलाईन रोडने पायी जात होते. त्यावेळी नफीज याने एका महिलेला विनाकारण मारहाण केली. त्याबाबत अतिक याने महिलांना का घाबरवतोस, का त्यांना मारहाण करतो अशी विचारणा नफिजला केली. याच रागातून नफीज याने धारदार चाकू अतिकच्या छातीत खुपसला. चाकूचा वार लागल्याने अतिक जागेवरच कोसळून गतप्राण झाला.

या घटनेची माहिती अतिकच्या कुटुंबीयांना लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अतिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

दरम्यान, हत्येप्रकरणी मृतक अतिकची आई रिजवान अंसारी हिने आरोपी नफीजच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी पोलिस पथकासह परिसरात सापळा रचून खुनी नफिजला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला बुधवारी बाल न्यायालयात हजर केले असता 20 दिवसांपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे फेब्रुवारी 2018 मध्येही आरोपी नफीज याने आणखी एक खून केल्याची बाब समोर आली आहे. त्याला अमली पदार्थ सेवन करण्याची सवय असल्याने त्या नशेतून तो विघातक कृत्य करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:महिलाला मारहाण करण्याच्या वादातून भररस्त्यात अल्पवयीन मित्राकडून अल्पवयीन मित्राचा चाकूने भोसकून खून ; आरोपी अटक

ठाणे :- एका महिलेला मारहाण करणाऱ्याच्या वादातून रागावलेल्या अल्पवयीन मित्रानेच अल्पवयीन मित्राच्या छातीत चाकू भोसकून भर रस्त्यात खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे,
ही घटना भिवंडीतील निजामी हॉटेल समोरील पाईपलाईन रोडवर घडली आहे . नफीज तोतला (वय 17 रा. शांतीनगर) असे हत्या करणाऱ्या आरोपी मित्राचे नाव आहे, तर अतिक जमील अन्सारी (वय 17 रा. न्यू आजाद नगर) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे,
मिळालेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी मित्र दोघेही काल रात्री च्या सुमाराला भिवंडी तील पाईपलाईन रोड ने पायी जात होते, त्यावेळी नफीज याने एका महिलेला विनाकारण मारहाण केली, त्याबाबत अतिक याने महिलांना का घाबरवतोस, का त्यांना मारहाण करतो अशी विचारणा नफिजला केली, याच रागातून नफीज याने धारदार चाकू अतिकच्या छातीत खुपसला, चाकूचा वार वर्मी लागल्याने अतिक जागेवरच कोसळून गतप्राण झाला,
या घटनेची खबर अतिक कुटुंबीयांना लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत अतिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला,
दरम्यान , हत्येप्रकरणी मृतक अतिकची आई रिजवान अंसारी हिने आरोपी नफीजच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी पोलिस पथकासह परिसरात सापळा रचून खुनी नफिज ला ताब्यात घेऊन अटक केली, त्याला बुधवारी बाल न्यायालयात हजर केले असता 20 दिवसांपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत,
धक्कादायक बाब म्हणजे फेब्रुवारी 2018 मध्ये ही आरोपी नफीज याने आणखी एक खून केल्याची बाब समोर आली आहे, त्याला अमली पदार्थ सेवन करण्याची सवय असल्याने त्या नक्षेतून तो विघातक कृत्य करीत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.