ठाणे - ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ( Thane Kashinath Ghanekar Theater ) या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित ( Swami Vivekanand Drama ) भाव नाट्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. यासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Sign Koshyari ) देखील उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त -
औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवप्रेमी व महाविकास आघाडी यांनी निषेध केलेला आहे, तर आज सकाळी सोलापूर दौऱ्या दरम्यानदेखील राज्यपालांचा दौरा अडवण्याचा काम सोलापूर येथे महाविकास आघाडीकडून करण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांनी निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात -
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात आंदोलने होणार, हे लक्षात घेऊन कालपासून पोलिसांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना नोटीसा बजावल्या होत्या, तर आगमनाच्या आधी अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यात ठाणे नगर पोलीस ठाणे वागळे इस्टेट पोलीस ठाणे आणि नौपाडा पोलीस ठाण्याचा हद्दीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.