ठाणे - राज्य सरकारच्या नियमावलीनुसार ( Maharashtra Government Guidelines ) आज महाराष्ट्रभरात बूस्टर डोस देण्याची सुरुवात झाली आहे ठाण्यातही फ्रन्टलाइन वर्कर्ससाठी तीसरा म्हणजेच बूस्टर डोस देण्याची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी सर्वच फ्रन्टलाइन वर्कर्सनी ( Front Line Workers ) बूस्टर डोस ( Booster Dose in Thane ) घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
एकीकडे राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तो रोखण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता सरकारने बूस्टर डोस देऊन हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरा डोस घेऊन 90 दिवस पूर्ण झालेल्या फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना आज (दि. 10 जानेवारी) राज्य सरकारने बूस्टर डोस देणे सुरू केले आहे. ज्यात आरोग्य कर्मचारी ( Health Workers ), पोलीस ( Police ) आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ( Government Servant ) समावेश आहे. सोमवारी सिव्हिल रुग्णलयात फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांची प्रकारची गर्दी पाहायला मिळाली आहे. बूस्टर डोस घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहे.
का घ्यावा बूस्टर डोस..? - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा बूस्टर डोस दिला जात आहे. यासाठी दोन्ही डोस घेतल्याचा पुरावा मागितला जात आहे. आता राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता हा डोस घेतला तर आपल्याला प्रादुर्भाव झाला तरी त्यामुळे जीवाचा धोका होणार नाही आणि आपण सहजरित्या कोरोनावर मात करू शकतो, अशी माहिती शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास साळवे यांनी दिली.
हेही वाचा - Mayor violated COVID 19 rules: ठाणे महापौरांकडूनच कोरोनाचे नियम पायदळी! गर्दीत उद्घाटन सोहळा