ठाणे - ठाण्यातील कळवा परिसरामध्ये काल रात्री सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात चार जण गंभीर जखमी झाले. हा प्रकार कळवा पूर्व परिसरातील शिवशक्ती नगर भागात झाला. सिलेंडर स्फोटामुळे या भागातील चाळीमध्ये भिंतींना भगदाड पडले असून, जखमी झालेल्या चौघांना कळव्यात शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - Police Arrested One Accused : 'त्या' मद्यपीची हत्या झाल्याचे उघड होताच एकास अटक, दुसरा फरार
स्फोटात चार कामगार गंभीर जखमी झाले असून, तपशील पुढीलप्रमाणे -
१) सत्यम मंगल यादव (वय 20)
२) अनुराज सिंग (वय 29)
३) रोहित यादव (वय 20)
४) गणेश गुप्ता (वय 19)
दुखापतग्रस्त कामगारांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. वरील सर्व व्यक्ती 80 ते 90 टक्के भाजले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
हेही वाचा - Student Beaten In Thane : अंगावर फेकला रंगाचा फुगा.. जाब विचारल्यावर विद्यार्थ्याला बेदम मारहाण