ETV Bharat / city

'गडकरी रंगायतन'ची तिसरी घंटा वाजणारच नाही; दुरुस्तीअभावी आणखी महिनाभर प्रतिक्षा

राज्यात विविध घटकांना केव्हाच सवलत देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने मुळातच नाट्यगृहावरील निर्बंध खुले करण्यास विलंब केला. त्याविरोधात कलावंतांनी आंदोलन छेडले. तर भाजपाने रेटा वाढविल्याने राज्य सरकारला जाग आली आणि नाट्यगृह खुले करण्याचा मुहूर्त ठरला. पण ठाणे महापालिकेच्या लेट लतिफमुळे ठाणेकरांची उपेक्षा संपलेली नाही, असे निरंजन डावखरे यांनी सांगितले.

author img

By

Published : Oct 22, 2021, 10:03 AM IST

गडकरी रंगायतन
गडकरी रंगायतन

ठाणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठी नाट्यप्रेमींकडून नाट्यगृहे उघडण्याची मागणी नाट्य रसिक आणि कलाकारांकडून होत असताना, ठाणे महापालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची २२ ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही. कारण या नाट्यगृहात अनेक तंत्रिक समस्या असून दुरुस्तीसाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

'गडकरी रंगायतन'ची तिसरी घंटा वाजणारच नाही

राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृहे व मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे मराठी नाट्यरसिकांना पुन्हा नाटक पाहण्याची ओढ निर्माण झाली आहे. ठाणे शहराचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून गडकरी रंगायतनची ओळख आहे. ठाणेकरांची नाटक पाहण्यासाठी पहिली पसंती गडकरी रंगायतनलाच असते. मात्र, आता नाट्यगृह सुरू होत असतानाच गडकरी रंगायतनचा पडदा महिनाभर उघडणार नाही व तिसरी घंटाही वाजणार नाही. ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम काढले असून, ते आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांबरोबरच रसिकांना नाटकालाही मुकावे लागेल.

गडकरी रंगायतन
गडकरी रंगायतन

नाट्यगृह बंद असताना दुरुस्ती का नाही केली?

यापूर्वी नाट्यगृहे बंद असताना महापालिकेने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा होती. मात्र, आता नाट्यगृह सुरू होण्यापूर्वी गडकरी रंगायतनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या कारभाराचा उगागच नाट्यरसिकांना फटका बसणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी मराठी माणूस व मराठी संस्कृतीच्या पोकळ गप्पा मारत मारतात. मात्र, त्यांना मराठी नाट्य रसिकांविषयी आस्था नसल्याचेच या प्रकारातून उघड झाले आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

भाजपची टीका

राज्यात विविध घटकांना केव्हाच सवलत देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने मुळातच नाट्यगृहावरील निर्बंध खुले करण्यास विलंब केला. त्याविरोधात कलावंतांनी आंदोलन छेडले. तर भाजपाने रेटा वाढविल्याने राज्य सरकारला जाग आली आणि नाट्यगृह खुले करण्याचा मुहूर्त ठरला. पण ठाणे महापालिकेच्या लेट लतिफमुळे ठाणेकरांची उपेक्षा संपलेली नाही, असे डावखरे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.