ETV Bharat / city

४० लाख रुपयांसाठी मित्राच्या मुलाचे अपहरण करणारे चौघे अंबरनाथमध्ये गजाआड - Ambernath kidnapping case

पोलिसांचे पाच पथक आरोपींच्या शोधात असतानाच पोलिसांनी कल्याणनजीकच्या मोहने परिसरातून चौघांना अटक करून त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली आहे. हे आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून ते मुलाच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी कृष्णाचे अपहरण केले होते.

author img

By

Published : Sep 12, 2021, 10:24 AM IST

Updated : Sep 12, 2021, 10:41 AM IST

ठाणे - ४० लाखांसाठी एका ९ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून ४० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या चार आरोपींना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने अटक करून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका करण्यास पोलिसांच्या पथकाला यश आले. अपहरणकर्ते हे दुसरे तिसरे कोणी नसून मुलाच्या वडिलांचे मित्रच निघाले आहेत. छोटू सिंग, अमजद खान, योगश सिंग, सुनील लाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीची ओळख पटली

अंबरनाथ शहरातील ग्रीन सिटी पार्कमध्ये राहणारे सोनू सरिता हे वडापावचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा कृष्णा हा ८ सप्टेंबरच्या सायंकाळी टय़ूशनला गेला. मात्र तो परतला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. याच दरम्यान मुलाचे चुलते सत्येंद्र यांना फोन आला, की मुलगा आमच्याकडे आहे. आम्ही त्याचे अपहरण केले असून ४० लाख रुपये आणून द्या, तेव्हाच मुलाला तुमच्या ताब्यात देऊ, असे आरोपींनी धमकी देऊन सांगितले. त्यांनतर पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. ठाणे, कल्याण, उल्हासनगर क्राइम ब्रांचसह अंबरनाथ पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला. पोलीस तपास सुरू असतानाच पुन्हा आरोपीने फोन आला. तेव्हा मोबाइल लोकेशन व पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले. सीसीटीव्हीत मुलाला आरोपी घेऊन जात असल्याचे दिसून आले. आरोपी हे मुलाच्या वडिलांच्या ओळखीचे होते.

वडील रुग्णालयात असल्याचे सांगून मुलाचे अपहरण

पोलिसांचे पाच पथक आरोपींच्या शोधात असतानाच पोलिसांनी कल्याणनजीकच्या मोहने परिसरातून चौघांना अटक करून त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली आहे. हे आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून ते मुलाच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी कृष्णाचे अपहरण केले होते. मुलाचे वडील आजारी असून रुग्णालयात उपचार घेत असल्याची बतावणी करून मुलाला हे घेऊन गेले. मुलगा त्यांना ओळखत असल्याने मुलाला काही वाटले नाही. तसेच आरोपी मुलाला त्रास देत नव्हते. मात्र त्यांचे बिंग अखेरीस फुटले. ठाणे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली असून मुलाच्या पालकांनी पोलिसांच्या कामगिरीचे अभिनंदन केले आहे.

Last Updated : Sep 12, 2021, 10:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.