नवी मुंबई - पेण येथुन वाशी येथे फिरण्यासाठी आलेल्या तरुणाला लुटण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली होती. प्रतीक रवींद्र आहेर (24) या तरुणावर शनिवारी रात्री खारघर येथे गोळीबार करण्यात आला होता. दरम्यान, गोळीबार करून फरार झालेल्या चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
विपीन शैलेंद्र ठाकुर (19), गोपाल ननु सिंह (23), अभिनंदनकुमार गणेश शर्मा (23) आणि मुचन नागेंद्र ठाकुर (19) अशी या आरोपींची नावे आहेत. लुटमार करुन मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरु करण्याची या तरुणांची योजना असल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जप्त केली आहे.
पोलिसांनी कोपरा भागात सापळा दोन तरुणांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडे चौकशी केली. त्यांनी तरूणाला लुटण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली नंतर त्यांच्या इतर दोन साथिदारांना देखील अटक केले. ज्या पिस्तूल मधून आरोपींनी गोळीबार केला ते पिस्तूल व जिवंत काडतूस देखील जप्त केले. लुटमार करुन मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरु करण्याचा प्लान आखल्याचे त्यांच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा- आज महाराष्ट्रात सर्वात कमी रुग्णांची नोंद, 30 रुग्णांचा मृत्यू