नवी मुंबई - नेरुळ शिरवणे एमआयडीसी परिसरात मायक्रोपेन फार्मा कंपनीला आज संध्याकाळी आग लागली. या कंपनीत औषधे बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशामक दलाने वर्तवली आहे.
आगीची तीव्रता वाढण्याआधीच कर्मचारी बाहेर पडले. कंपनी जवळून जाणाऱ्या नागरिकांनी आग्मनिशामक दलाला पाचारण केले. तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामकच्या अधिकाऱयांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच काळजी घेतल्याने संबंधित घटनेत जीवित हानी टळली. मात्र, मोठया प्रमाणात वित्त हानी झाल्याची माहिती उप अग्निशामक अधिकारी सुरेश गोल्हार यांनी दिली आहे.