ठाणे : शहापूर तालुक्यातील पाषाणे हद्दीत असलेल्या कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीमध्ये काही कोंबड्याचा मृत्यू झाला होता. त्याची तपासणी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येऊन राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग विभागाकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यामध्ये कोंबड्याचा बर्ड फ्ल्यू या आजाराने मृत्यू झाल्याचा अहवाल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मौजे पाषाणे येथील व परिसरातील १ किमी बाधित क्षेत्रातील प्रभावित कुक्कुट वर्गीय पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कुक्कुटपालन शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
![bird flu](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-2-shahapur-2-bayet-1-vis-2-photo-mh-10007_18022022114411_1802f_1645164851_1086.jpg)
हेही वाचा - Arvind Kejriwal Khalistan Issue : कुमार विश्वास यांच्या आरोपावर अरविंद केजरीवाल यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...