ETV Bharat / city

गॅस मेकॅनिक असल्याचे भासवून गृहिणींना गंडा घालणारा सीसीटीव्हीत कैद - thane crime news in marathi

आतापर्यंत या बदमाशाने मीटर रिडिंगसाठी कंपनीकडून आल्याची थाप मारून गॅसच्या शेगडीत दोष असल्याचे भासवून पैसे उकळले आहेत.

gas mechanic capture on CCTV
gas mechanic capture on CCTV
author img

By

Published : Jul 17, 2021, 5:23 PM IST

ठाणे - एमजीएल अर्थात महानगर गॅस कंपनीचा मीटर रीडर आणि मेकॅनिक असल्याची थापेबाजी करून घरगुती गॅस ग्राहकांची विशेषतः गृहिणींची लूट करणारा बदमाश अखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आतापर्यंत या बदमाशाने मीटर रिडिंगसाठी कंपनीकडून आल्याची थाप मारून गॅसच्या शेगडीत दोष असल्याचे भासवून पैसे उकळले आहेत. बुधवारी दिवसभरात लागोपाठ दोन गृहिणींची फसवणूक केल्याने डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात खळबळ उडाली आहे.

महानगर गॅस निगमशी संपर्क केल्यानंतर घटना समोर

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील कोमल सोसायटीमध्ये राहणाऱ्या संगीता महामुनी यांच्याकडून गुगल-पेद्वारे 2 हजार 250 रूपये उकळून पसार झालेल्या त्याच व्यक्तीने RH-16 नव प्राजक्ता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 68 वर्षीय लक्ष्मी माधव या वयोवृद्ध गृहिणीलाही गंडा घातल्याचे उघडकीस आले. बुधवारी दुपारच्या सुमारास गॅसच्या मीटर रीडिंगसाठी कंपनीकडून आल्याचे सांगून लक्ष्मी यांनी भोसले आडनाव सांगणाऱ्या त्या अनोळखी इसमाला घरात घेतले. त्याने मीटर रीडिंग घेतले आणि सर्वे करणार असल्याचे सांगून त्याने शेगडी तपासली. ही शेगडी लिकेज आहे, व्हॉल्व्ह बदलावे लागतील, अशी थाप मारून त्याने 5 व्हॉल्व्हचे 3 हजार 750 रूपये उकळले. ही रक्कम त्याने रोखीने घेतली. विश्वास बसावा म्हणून त्या इसमाने ही रक्कम तुमच्या पुढील बिलात वळती होऊन येईल, अशीही थाप मारली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने लक्ष्मी यांनी संध्याकाळी सोसायटीच्या चेअरमन व खजिनादारांच्या कानावर घातला. असा कुणीही माणूस आमच्याकडे आला नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मी यांना सांगितले. मात्र या पदाधिकाऱ्यांनी अधिक चौकशीकरिता महानगर गॅस निगमला फोन केला. मात्र असा कुणीही माणूस आम्ही पाठविलेला नसल्याचे महानगर गॅस कंपनीकडून सांगण्यात आले.

'ग्राहकांनी थेट पोलिसांत तक्रार द्यावी'

लक्ष्मी यांचे चिरंजीव गोपाळ माधव म्हणाले, की यासंदर्भात संगीता महामुनी आणि आमच्या आईच्या बाबतीत घडलेल्या फसवणुकीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तर या संदर्भात महानगर गॅस लिमिटेड कंपनीने ग्राहकांना खबरदारीचा संदेश दिला आहे. एमजीएल कोणतीही वस्तू विकत नाही किंवा गॅस स्टोव्हच्या देखभाल/दुरुस्तीसंदर्भात कोणतेही अनुदान देत नाही. सेवेसाठी अधिकृत विक्रेत्यांच्या एमजीएल वेबसाइट/कॉलवर उपलब्ध यादीनुसार ग्राहक सेवा क्रमांक देण्यात आले आहेत. स्टोव्ह/बर्नर सेवेसाठी आलेल्या व्यक्तीचे प्रथम ओळखपत्र तपासावे. एमजीएल सेवा प्रदाता किंवा बीपीसीएलचा अधिकृत एजन्सीकडून फसव्या कृती झाल्यास ग्राहकांनी थेट पोलिसांत तक्रार द्यावी, असेही आवाहन कंपनीने केले आहे. गॅस, गिझरच्या अधिकृत आणि सुरक्षिततेसाठी ग्राहक हेल्पलाइनच्या 68674500 किंवा 61564500 क्रमांकांवर संपर्क साधावा. तर गॅस सेवेसाठी कर्मचारी, मीटर रीडर, एजन्सीशी संपर्क साधण्यासाठी 022-24045784 वर संपर्क साधण्याचे कंपनीने आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.