ETV Bharat / city

Eknath Shinde Call : सामान्य कार्यकर्त्यासाठी एकनाथ शिंदेंनी केला एम्सच्या डाॅक्टरांना फोन; मात्र उपचारादरम्यान मृत्यू - Eknath Shinde Talk with Doctors

"हॅलो डॉक्टर! मी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) बोलतोय. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा. माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विनंती", हे संभाषण ( Eknath Shinde Talk with Doctors ) होते एकनाथ शिंदे यांचे. डोंबिवलीतील सेना उपशहरप्रमुख राम मिराशी ( Ram Mirashi ) यांची २१ जून रोजी अचानक तब्येत बिघडल्याने एम्स रुग्णालयात ( AIIMS Hospital ) दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीस्वास्थकरिता स्वतः एकनाथ शिंदे बोलत होते.

Eknath Shinde and activists
एकनाथ शिंदे आणि कार्यकर्ता
author img

By

Published : Jun 24, 2022, 5:24 PM IST

ठाणे : "हॅलो डॉक्टर! मी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) बोलतोय. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा. माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विनंती", हे संभाषण होते एकनाथ शिंदे यांचे. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयातील ( AIIMS Hospital ) डॉक्टरांशी फोनवर बोलले. डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी ( Ram Mirashi ) यांची २१ जून रोजी अचानक तब्येत बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू ( Unfortunate Death ) झाल्याचे सांगण्यात आले.

महेश पांचाळ रुग्णालय व्यवस्थापक

अतिदक्षता विभागात उपचार : अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू होते. आपल्या शिवसैनिकाची तब्बेत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. २३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मंत्री शिंदेंनी डॉक्टरांना कॉल केला. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून, त्याची काळजी घ्या, अशी विचारपूस केली होती. मात्र, अचानक आज उपचारादरम्यान मिराशी यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एकनाथ शिंदेंचे कार्यकर्त्यांप्रतीचे प्रेम : महाराष्ट्रात एवढं मोठा राजकीय भूकंप झाला असून, सरकार पडेल का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. आपल्या राजकीय कामात गुंतले असतानाही शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्याची फोनवरून चौकशी केल्याबद्दल शिवसैनिकांनाही बरे वाटले. मात्र, हा आनंद काही काळासाठी होता. अशी चर्चा करून शिवसैनिक हळहळ व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : Eknath Shinde Left Hotel : एकनाथ शिंदे हॉटेलमधून पडले बाहेर, मुंबईच्या दिशेने नव्हे कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.