नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका हद्दीत 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून मिळाली आहे. 8 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले ही दिलासादायक बाब आहे, अशी माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी 5 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. महापालिका क्षेत्रातील 143 कोरोनाबाधित रूग्णांपैकी आतापर्यंत 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 7 जणांचा मृत्यु झाला आहे. सध्या महापालिका हद्दीत 87 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 4 मे रोजी गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या महिलेचा आणि एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
5 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, होम नर्स, बँक कर्मचारी यांचा समावेश आहे. सकारात्मक बाब म्हणजे आज पनवेल महापालिका हद्दीत तब्बल 8 रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.