ETV Bharat / city

ATM Theft : गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या तीन चोरटयांना मुरबाड पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Axis Bank ATM

मुरबाड शहरात ( Murbad city ) काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विद्यानगर भागातील एक्सीस बँकेचे एटीएम ( Axis Bank ATM ) फोडण्यासाठी तीन चोरटे सिटी होंडा कारने आले होते. त्यावेळी एटीएम फ़ोडून चोरी ( ATM theft ) करण्यासाठी लोखंडी पार, गॅस कटरसह इतर साहित्य घेवून आलेल्या चोरट्याची खबर गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुरबाड पोलिसांनी ( Murbad Police ) संपूर्ण शहराची नाकाबंदी करून पळून गेलेले तीन आरोपी त्यांच्या होंडा सिटी कारसह रंगेहात ( Three accused were arrested ) पकडले आहेत.

Three accused were arrested
तीघांना अटक
author img

By

Published : Jul 17, 2022, 8:56 PM IST

ठाणे : महाराष्ट्राच्या विविध शहरात बँकेच एटीएम फ़ोडून चोरीचे ( ATM theft ) गुन्हे घडत असतानाच मुरबाड पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक्सीस बँकेचे एटीएम फोडणाऱ्या तिघा चोरटयांना गॅस कटरसह एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य व सिटी होंडा कार जप्त करून तिघांना बेड्या ( Three accused were arrested ) ठोकल्याची घटना समोर आली आहे.

पोलीस घटनास्थळी पोहचल्याने बँकेचे लाखो रुपये वाचले.. मुरबाड शहरात गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या ( ATM theft ) घटना घडत असल्याने अनेक महिन्यापासून शहरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. अश्यातच काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विद्यानगर भागातील एक्सीस बँकेचे एटीएम ( Axis Bank ATM ) फोडण्यासाठी तीन चोरटे ( three thieves ) सिटी होंडा कारने आले होते. त्यावेळी एटीएम फ़ोडून चोरी करण्यासाठी लोखंडी पार, गॅस कटरसह इतर साहित्य घेवून आलेल्या चोरट्याची खबर गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, एपीआय सोनोने, पीएसआय तळेकर पोलीस नाईक रामा शिंदे, अमोल माळी, विजय गांजाळे यांनी घटनास्थळी सापळा रचून एटीएम तोडत असतानाच चोरटयांना पकडण्याचा प्रयत्न केला असता तिन्ही चोरटे पळून गेल्याने बँकेचे लाखो रुपये वाचले.

हेही वाचा - MLAs Suspension Petition Hearing : आमदार निलंबनाच्या याचिकेवर 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नाकाबंदीमुळे चोरटे पोलिसांच्या तावडीत.. त्यानंतर मुरबाड पोलिसांनी संपूर्ण शहराची नाकाबंदी करून पळून गेलेले व लपून बसलेले सर्व तीन आरोपी त्यांच्या होंडा सिटी कारसह रंगेहात पकडले आहेत. या कामगीरीत पीएसआय निंबाळकर, पो.ह. शेलार, पो. ना. कैलास पाटील, पोलीस शिपाई चालक भगवान बांगर पोह. सुरवाडे, दिघे, खंडाळे यांच्याही सहभाग होता. मुरबाड पोलिसांच्या ह्या धाडसी सतर्क पोलिसिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाईची मागणी.. मुरबाड शहरातील सर्व बँक व एटीएम, सोनारीची दुकाने , व आर्थिक व्यवहार कारणाऱ्या संस्थाना सुरक्षारक्षक नेमणे बाबत मुरबाड पोलिसांकडून वेळोवेळी बैठका घेवून, तसेच लेखी कळवून देखिल त्यांनी सुरक्षा रक्षक नेमले नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या पैश्याची बँका काळजी घेत नाहीत. या घटनेनंतर बँक व एटीएम सेंटर बाबत नागरिकांमधून नाराजी पसरली असून सुरक्षा न पुरविणाऱ्या अश्या बँक व्यवस्थापाकावर पोलिसांनी कारवाई करावी मागणी आता नागरिकांकडून होत आहे,

पोलीस गस्तीमुळे गुन्ह्यात घट .. गेल्या १० महिन्यापासून मुरबाड पोलिसांनी रात्री व दिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या ८ ते ९ महिन्यात मुरबाड शहारत मध्यरात्री ते पहाटेपर्यत पोलीस अधिकाऱ्यासह पथक सतत गस्त घालत असल्याने शहरात चोऱ्या व गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी सर्व बँक , एटीएम ,सोनारीची दुकाने व आर्थिक व्यवहार संस्था चालकांना रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक ठेवावे असे आव्हान केले आहे.

चोरट्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी.. दरम्यान अटक कऱण्यात आलेले चोरटे टिटवाळा भागात वास्तव्यास असून दोघे नगर जिल्ह्यातील मूळ रहिवाशी तर एक चोरटा मूळचा राजस्थानचा असल्याचे पोलीस तपास समोर आले आहे. या चोरटयांनी इतरही काही ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक तिन्ही चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी दिली आहे.

हेही वाचा - New GST Rates : जीएसटीमध्ये वाढ.. सोमवारपासून खाद्यपदार्थांसह 'या' वस्तू होणार महाग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.