ठाणे - दरवर्षी प्रमाणे खासदार राजन विचारे यांच्यामार्फत ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमामध्ये तरुणाईचा जल्लोष पहायला मिळाला. तसेच यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा... मतदान झाले... दिवाळीसाठी सजल्या बाजारपेठा, खरेदीसाठी लोकांची लगबग वाढली
ठाणे शहरात रविवारी 'दिवाळी पहाट' हा सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या तलावपाळी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी खासदार राजन विचारे यांच्यातर्फ दिवाळी पहाट निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभुषेत अवघी तरुणाई येथे अवतरली होती. कार्यक्रमातील गाण्यांवर युवा वर्गाने बेहोष होऊन नृत्य केले. तसेच कोळीगीतांसह अनेक पारंपारिक गाण्यांवर ठाणेकरांनी ठेका धरला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून भेट दिली आणि सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा... एमआयएमच्या भिवंडी शहराध्यक्षपदी खालिद गुड्डू यांची नियुक्ती
सर्व अधिकार पक्षप्रमुखांना - एकनाथ शिंदे
शिंदे यांना राज्यातील सरकार स्थापनेबाबत आणि शिवसेनेच्या भुमिकेबाबत विचारले असता, त्यांनी कालच शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली आहे. तसेच बैठकीत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले असल्याचे सांगितले. तसेच तेच योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.