ETV Bharat / city

'निधीबाबत ठाकरे सरकारची नेहमीचीच बोंब'

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने केंद्र सरकारची मदत घ्यावी. जेणेकरुन गरीब आणि मध्यमवर्गाला ही लस मोफत मिळेल.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 7, 2021, 7:23 PM IST

Updated : Jan 7, 2021, 7:40 PM IST

ठाणे -केंद्राकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची ही रोजचीच बोंब आहे, अशा शेलक्या शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

ठाण्यातील भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयोजीत केलेल्या सहस्त्रचंडी नवकुण्डीय महायज्ञाच्या दर्शनासाठी बुधवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी मोफत लसीकरणाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने केंद्र सरकारची मदत घ्यावी. जेणेकरुन गरीब आणि मध्यमवर्गाला ही लस मोफत मिळेल. यंदा कोरोनाचे संकट बघता आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात काम करणाऱ्या राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे यावेळी फडणवीस यांनी कौतुक केले. 2021 वर्ष कोरोनाचा शेवट ठरो, अशी प्रार्थना त्यांनी केली. कोरोना भूतकाळात जावो, असे फडणवीस यांनी साकडे देवीला घातले.

निधीबाबत ठाकरे सरकारची नेहमीचीच बोंब

कोरोना काळात काम करणाऱ्या महिलांचा 'नवदुर्गा सन्मान'

कोरोना काळात काम करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या ठाण्यातील नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा पुरस्कार देण्यात आला. समाजात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, असेदेखील यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

नवदुर्गांचा सत्कार
नवदुर्गांचा सत्कार

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कमानीचे उद्घाटन

कोपरीतील बारा बंगला जवळील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एजल्स पॅराडाईस या कमानीचे उद्घाटन यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी परिसराचे प्रवेशद्वार म्हणून ही अटल कमान म्हणून ओळखली जाणार आहे.

अटल कमानीचे उद्घाटन
अटल कमानीचे उद्घाटन

नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
ठाण्यातील कोपरी येथे मार्गशीर्ष महिन्याच्या महिन्यात महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये 9 दिवस देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दररोज विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी खासदार कपिल पाटील,आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते संजय वाघुले आदीं सह भाजपचे नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Jan 7, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.