ETV Bharat / city

कोरोना काळात रविवारचा ठाणे बाजार "फुल्ल".. नियम धाब्यावर - ठाणे लॉकडाऊन

दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यात कमालीची वाढ होताना दिसत असून राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. विकेंडच्या दिवशी कडकडीत बंद ठेवण्यात आला असून इतर दिवशी कडक निर्बंध घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. असे असताना रविवारच्या संध्याकाळी मात्र ठाणेकरांनी सुट्टीच्या दिवशी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती.

Crowds of citizens in Thane market
Crowds of citizens in Thane market
author img

By

Published : Apr 4, 2021, 11:12 PM IST

ठाणे - दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यात कमालीची वाढ होताना दिसत असून राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. विकेंडच्या दिवशी कडकडीत बंद ठेवण्यात आला असून इतर दिवशी कडक निर्बंध घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. असे असताना रविवारच्या संध्याकाळी मात्र ठाणेकरांनी सुट्टीच्या दिवशी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. अक्षरशः कोरोनाचे नियम पायदळी तुडवत नागरिकांनी बाजारपेठत "फुल्ल टू" गर्दी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाला एकप्रकारे कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे. ठाणे महापालिका हद्दीत दिवसाला सरासरी हजारो कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, तर दुसरीकडे ठाणेकर नागरिक कोरोना विषाणूच घरी घेऊन जात आहेत.

ठाणे स्टेशन रोड मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे पाहायला मिळत आहे. तसेच रविवारच्या दिवशी भाजी मंडईमध्ये देखील तूफान गर्दी झाली होती. हे चित्र पुढच्या रविवारी बघायला मिळणार नसले तरी मात्र, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीचे पालन आता तरी केले जाणार का ? हे पाहावे लागेल. याआधी लागू करण्यात आलेल्या नियम नागरिकांकडून पाळले जात नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. महापालिका प्रशासन तसेच पोलिसांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे की काय ? कारण महापलिकेची कोणतीही यंत्रणा काम करताना किंवा गर्दीवर नियंत्रण मिळवताना दिसून येत नाही.

कोरोना काळात रविवारचा ठाणे बाजार "फुल्ल"

बाजारात बिना मास्क फिरणारे अनेक -

कारोनाचे रुग्ण वाढत असूनही मार्केटमध्ये अनेकजण मास्क वापरात नाहीत, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत असे चित्र आहे. भाजी मंडईमध्ये देखील भाजी विक्रेते दाटीवाटीने बसलेले आहेत, हेच चित्र बदलण्यासाठी आता वीकेंडला लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. एकीकडे राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन कंबर कसून काम करत आहे, कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे महापालिकेने हजार बेडचे नवीन रुग्णालयात उभारले आहे. मात्र कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनासह ठाणेकर नागरिक देखील तितकेच जबाबदार आहेत. भविष्यात कोरोनाला अटकाव घालायचा असल्यास प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.

सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी -

रविवार दिवस सुट्टीचा असल्याने मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. कोरोना सारख्या भयंकर आजाराने अनेकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून वागले तर आटोक्यात येणार आहे. सरकारने व्यापाराची देखील परिस्थिती पाहून पुढील निर्णय घ्यावा, असे व्यापारी सांगत आहेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.