ETV Bharat / city

Aaditya Thackeray Shiv Sanvad Yatra : आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला ठाण्यातील नगरसेवकांची पाठ; १२ नगरसेवक शिंदे गटाच्या मार्गावर - Shiv Sanvad Yatra

आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला शिवसेनेच्या नगरसेवकांकडूनच पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे हे आज दुपारी भिवंडीत ( Aditya Thackeray in Bhiwandi ) शिव सवांद दौऱ्यावर आले आहेत. मात्र भिवंडी महापालिकेतील शिवसेनेच्या १२ नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक दौऱ्यात उपास्थित नसल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे, नवीमुंबई, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर पाठोपाठ भिवंडीतील नगरसेवकांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याचे समोर आले आहे.

Aditya Thackerays Shiv Sanvad Yatra
आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा
author img

By

Published : Jul 21, 2022, 2:58 PM IST

ठाणे - शिवसेनाच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा आजपासून सुरू झाली आहे. मात्र, त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांकडूनच पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या १२ खासदारांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश ( 12 Shiv Sena MPs joined Shinde Group ) केल्याने शिवसेनेला पुन्हा महाराष्ट्रात शून्यापासून उभारी घ्यावी लागणार आहे. आता ही पूर्ण जिम्मेदारी नव्याने पेलण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Yuva Sena leader Aditya Thackeray ) सज्ज झाले आहेत. २१ ते २३ जुलै या दरम्यान महाराष्ट्रातील शिवसंवाद यात्रेला ( Shiv Sanvad Yatra ) ते सुरुवात करणार असून महाराष्ट्रातील जनतेशी आणि लाखो शिवसैनिकांची मन जिंकण्यासाठी त्यांनी ही संवाद यात्रा सुरू केलेली आहे.

भिवंडीतील नगरसेवकांनी पाठ - आदित्य ठाकरे हे आज दुपारी भिवंडीत ( Aditya Thackeray in Bhiwandi ) शिव सवांद दौऱ्यावर आले आहे. मात्र भिवंडी महापालिकेतील शिवसेनेच्या १२ नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक दौऱ्यात उपास्थित नसल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे, नवीमुंबई, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर पाठोपाठ भिवंडीतील नगरसेवकांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याचे समोर आले आहे.

आदित्य ठाकरे शिवसैनीकांशी साधणार संर्पक - युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आज भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात शिवसैनीकांशी संर्पक साधणार आहेत. आज भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आदित्य ठाकरे पोहचले आहेत. त्यावेळी शेकडो शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत करून संवाद साधला. मात्र भिवंडी महापालीकेतील शिवसेनेचे १२ नगरसवेक पैकी एकही उपस्थित दिसत नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महापालिका व नगरपालिकेतील शिंदे गटाचे सामील झाले आहे.

शिव संवाद यात्रेच वेळापत्रक - शिव संवाद यात्रेचा प्रारंभ हा २१ जुलै २०२२ रोजी भिवंडी ( Shiv Sanvad Yatra starts from Bhiwandi ) येथे दुपारी १२ वाजता संपन्न होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याने होणार असून प्रथम दिवसाच्या यात्रेची सांगता नाशिक येथे संध्याकाळी ६:३० या वेळेत होणाऱ्या जन मेळाव्याने होणार आहे.

दिनांक २१ जुलै २०२२ - दुपारी १२ वाजता भिवंडी येथे मेळाव्याने शिवसंवाद यात्रेला सुरुवात होईल. दुपारी २:३० ते २:५० शहापूर ( Shahapur ) येथे स्वागत संवाद. दुपारी ३:५० ते ४:१५ इगतपुरी ( Igatpuri ) येथे स्वागत संवाद. संध्याकाळी ५:४५ ते ६:४५ वाजता नाशिक येथे शिवसंवाद ( Shiv Samvad at Nashik ).

दिनांक २२ जुलै २०२२ - या शिव संवाद यात्रेच्या द्वितीय दिवशी, सकाळी ११:४५ मनमाड शहरात संपन्न होणाऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे जनतेला संबोधित करणार असून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेची सांगता संभाजीनगर येथे सायंकाळी ६:३० वाजता होणाऱ्या मेळाव्याने होईल. सकाळी ११:४५ दुपारी १२:४५ मनमाड येथे शिवसंवाद मेळावा. दुपारी १:४० ते २:०० वाजेपर्यंत येवला येथे स्वागत संवाद. दुपारी २:४५ ते ३:०० वाजेपर्यंत वैजापूर येथे स्वागत संवाद. संध्याकाळी ५:३० ते ६:३० वाजता संभाजीनगर येथे शिवसंवाद मेळावा.

दिनांक २३ जुलै २०२२ - या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता पैठण येथे शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. यात्रेची सांगता सायंकाळी ५:१५ शिर्डी येथे शिर्डी वासियांकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताने तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री साईंच्या दर्शन आणि आशीर्वादाने होईल. सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत पैठण येथे स्वागत संवाद. दुपारी २:०० ते २:२० गंगापूर येथे स्वागत संवाद. दुपारी २:५० ते ४:०० वाजेपर्यंत नेवासा येथे शिवसंवाद मेळावा. संध्याकाळी ४:४५ ते ५:१५ शिर्डी येथे स्वागत आणि दर्शन.

हेही वाचा - Langurs Rescue in Nagpur: अडकलेल्या वानराच्या सूटकेसाठी बनवला २०० मीटर लांबीचा कृत्रिम पूल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.