ETV Bharat / city

दिलासादायक..! नवी मुंबईत एकाच दिवशी 277 रुग्ण बरे होऊन घरी

आजची दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 277 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. 65 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

नवी मुंबई
नवी मुंबई
author img

By

Published : May 29, 2020, 9:35 PM IST

नवी मुंबई - कोरोनाचा कहर वाढत असला तरी आज एक दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 277 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. 65 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मात्र, वाढते रुग्ण रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 2007 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 11 हजार 302 लोकांची कोविड-19 चाचणी करण्यात आली आहे, यामध्ये 8 हजार 460 जण निगेटिव्ह आले असून 876 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,996 इतकी आहे.

आज 65 जण (29मे ) कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भेमधील 11, बेलापूरमधील 10, कोपरखैरणे मधील 14, नेरूळमधील 6, वाशीतील 2, घणसोलीमधील 2, ऐरोली मधील 13, दिघ्यामधील 7 असे एकूण 65 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 26 स्त्रिया व 39 पुरुषांचा समावेश आहे. शहरात 1996 इतका कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 1158 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर आज नेरूळमधील 55, बेलापूरमधील 12, वाशीमधील 26, तुर्भेमधील 89, कोपरखैरणेमधील 62, घणसोलीमधील 23, ऐरोलीमधील 13 व दिघ्यात 2 अशा एकूण 277 व्यक्ती आज कोरोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यामध्ये 101 स्त्रिया आणि 176 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीत 775 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.