ठाणे - मोरुची मावशी या नाटकातील आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा ( Cluster Beans) . या गाण्याने रसिकांची मने जिंकली होती. मात्र शेंगा पार महागाईच्या झाडावर पोहचल्यामुळे स्वयंपाक घरात गृहिणींच्या डोळयात पाणी आणले आहे.इंधन दरवाढ व अवकाळी पाऊस यामुळे सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे ,त्यात शेवग्याच्या शेंगाची किंमत तर ४०० रुपये किलो तर मटार २०० रुपये किलो झाले आहेत.
आमटी, डाळ, सांबाराची चव वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा ( Cluster Beans) बाजारात ३८० ते ४०० रुपये किलो दराने विकली जात आहे. आजच्या घडीला सर्वात महागडी भाजी म्हणून शेवग्याची शेंग भाव खात असल्याने जेवणाच्या ताटातून ती हद्दपार होऊ लागली आहे. नवरात्रोत्सव व दिवाळी या सणासुदीच्या दिवसानंतर अनेकांचा मांसाहार सोडून शाकाहारी खाण्याकडे अधिक कल असतो. भाजी मंडईत सकाळी वाशी, नाशिक, कल्याण येथील मार्केट मधून भाजीपाल्याची आवक होत असते. परंतु इंधन दरवाढ व अवकाळी पाऊस यामुळे सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे. यासाठीच आरोग्यवर्धक आणि पदार्थाची लज्जत वाढवणाऱ्या शेवग्याच्या शेंगा 100 रुपये किलोने विकल्या जात होत्या. मात्र याच शेंगा ३८० व ४०० रुपये दराने विकल्या जात आहे. तर मटार २०० रुपये किलो झाले आहेत.चिकनपेक्षा शेवग्याच्या शेंगा महाग चिकन पेक्षा भाज्या महाग