ETV Bharat / city

Bawankule criticized Ajit Pawar - शिंदे, फडणवीस विकास कामांसाठी दिल्लीला जातात, अजित पवारांनीही यायचे असल्यास सांगावे - बावनकुळे - अजित पवार यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मागील अडीच वर्षांत जी चुकीची कामे झाली असतील त्यांची ( Bawankule criticized Ajit Pawar during Thane visit ) चौकशी केली जाईल, अशी माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule Thane visit ) यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी अजित पवारांना लक्ष केले.

Chandrasekhar Bawankule criticized
अजित पवार यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
author img

By

Published : Aug 7, 2022, 7:19 AM IST

Updated : Aug 7, 2022, 10:03 AM IST

ठाणे - मागील अडीच वर्षांत जी चुकीची कामे झाली असतील त्यांची ( Bawankule criticized Ajit Pawar during Thane visit ) चौकशी केली जाईल, अशी माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात ( Bawankule Thane visit ) पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी अजित पवारांना लक्ष केले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे सध्या कोणतेही ठोस असे मुद्दे नाहीत. त्यामुळेच, ते मंत्रिमंडळ विस्तार या एकमेव मुद्द्यावर ( Chandrasekhar Bawankule on development works thane ) बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विकासकामांसंदर्भात दिल्लीला जात असतात. परिणामी, अजित पवार यांनाही दिल्लीत जायची इच्छा असेल तर त्यांनी तसे शिंदे आणि फडणवीस यांना सांगावे, म्हणजे ते त्यांनाही बरोबर घेऊन जातील, असा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी कळवा येथील पत्रकार परिषदेत लगावला.

माहिती देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे

हेही वाचा - Flag Distribution Center in Thane: ठाणे ग्रामीण भागातील ध्वज वितरण केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

चारपट चांगले काम शिंदे आणि फडणवीस करतील - आगामी लोकसभा निवडणुकीसह अन्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपचे कमळ फुलवण्याच्या निर्धाराने केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून दौरे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेअंतर्गत कळवा येथे बावनकुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी ठाण्याचे आमदार संजय केळकर उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच काम केले नाही. त्यांच्यापेक्षा चारपट चांगले काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पुढील अडीच वर्षांत करतील, असा विश्वास बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

अजित पवारांनी सक्षम विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजवावी - अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना जे जमले नाही ते काम शिंदे फडणवीस जोडी करून दाखवेल. पण, मागील अडीच वर्षांत राज्यातील विकास थांबला होता. तो विकास करण्याचे काम शिंदे फडणवीस करत आहेत. काही जण सरकार पडण्याची स्वप्न दिवसा पाहत आहेत. तेव्हा, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आरोप न करता सक्षम विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजवावी, असा सल्ला देखील बावनकुळे यांनी दिला.

अजित पवारांना दिल्ली वारी करायची असेल तर सांगावे - विरोधी पक्षाकडे बोलण्यासाठी काहीच मुद्दे नसल्याने तेे केवळ मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा बाहेर काढत आहेत. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिल्ली दोऱ्यावर जातात. आजही ते नीती आयोगाच्या बेठकीसाठी गेले आहेत. तरी अजित पवार यांनाही दिल्ली वारी करायची इच्छा असल्यास त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांना तसे सांगावे, म्हणजे त्यांनाही ते बरोबर घेऊन जातील, असे बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपचेच खासदार - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १६ मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना दिली आहे. तीन दिवसांचा २१ कलमी कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघाकरीता अनुराग ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना बावनकुळे यांनी राज्यातील ४८ पैकी ४८ लोकसभेच्या जागा भाजपच लढणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - Thane Mental Hospital: कुटुंबियांच्या भेटीसाठी आसुसले ठाण्यातील मनोरुग्ण; मात्र नातेवाईकांची रुग्णांकडे पाठ

Last Updated : Aug 7, 2022, 10:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.