ठाणे - शुक्रवारपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने सकाळपासून चांगलाच जोर धरल्यामुळे मुंबईसह उपनगरांमधील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. तसेच पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक एक तास उशिराने होत आहे.
रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत सकाळपासून रेल्वेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.