ETV Bharat / city

खांबावर चढलेल्या मनोरुग्णामुळे मध्य रेल्वेची वाहतूक एका तासासाठी खोळंबली - मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी एक तरुण ठाणे रेल्वे स्थानकावरील स्लो ट्रॅकवरील ओव्हर हेड वायर खांब क्रमांक ३२/२० एम वर चढला होता. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक एक तासासाठी बंद करण्यात आली होती.

मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली
author img

By

Published : Aug 14, 2019, 11:43 PM IST

ठाणे - कधी पावसामुळे तर कधी तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांच्या प्रवासाचे हाल होतात. मात्र, बुधवारी एका तरुणामुळे मध्य रेल्वेची सेवा तब्बल एका तासासाठी विस्कळीत झाली होती.

दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी एक तरुण ठाणे रेल्वे स्थानकाजवळच स्लो ट्रॅकवरील ओव्हर हेड वायरच्या खांब क्रमांक ३२/२० एमवर चढला होता. घटना स्थळावरुन हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे लोहमार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले. यानंतर सुरुवातीला मुंबई ते कल्याण धिम्या रेल्वे मार्गावरील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. आणि १०-१५ मिनिटांच्या मेहनतीनंतर या तरुणाला खांबावरून खाली उतरवण्यात आले. यामुळे एक तास मुलूंड ते कल्याण धिम्या ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

घटनेचा माहिती देतांना पोलीस निरिक्षक

खांबावर चढलेला तरुण हा झारखंड राज्यातील सिमदेगा जिल्ह्यातील कुंदूरमुंडा या गावाचा रहिवाशी असून त्याचे नाव मंगल रामपाल यादव असे त्याने सांगितले आहे. जवळपास ३ आठवड्यांपूर्वी हा तरुण गीतांजली एक्स्प्रेसने ठाण्यात त्याच्या सहकाऱ्यांसोबत कामाकरीता आला होता. मात्र, यापुढचे त्याला काहीही आठवत नसल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. प्राथमिक चौकशीत हा तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले होते. मात्र, सखोल चौकशी केल्यानंतर हा तरुण मनोरुग्ण नसून तो काम न मिळाल्यामुळे असे वागला असावा, अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

Intro:मध्य रेल्वेची वाहतूक एकाने थांबवली प्रवाश्यांचे हालBody:कधी पावसामुळे कधी तांत्रिक अडचणींमुळे तर आज तब्बल एक तास एका तरुणामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती... साधारण ४ वाजून ५० मिनिटांनी एक तरुण ठाणे रेल्वे स्थानकावर स्लो ट्रॅकवरील ओव्हर हेड व्हायर खांब क्रमांक ३२/२० एम या खांबावर चढला ... या घटना स्थळावरुन हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे लोहमार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले आणि पहिले मुंबईत ते कल्याण धिम्या रेल्वे मार्गावरील वीज पुरवठा खंडीत केला आणि तरुणाला १०-१५ मिनिटात खांबावरून खाली उतरवला यामुळे साधारण एक तास मुलूंड ते कल्याण धिम्या ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली होती... खांबावर चढलेला तरुण हा झारखंडचा राहणारा असून त्याचे नाव मंगल रामपाल यादव असं तो सांगतोय... झारखंड राज्यातील सिमदेगा जिल्ह्यातील कुंदूरमुंडा या गावाचा असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिलीये... जवळपास ३ आठवड्यापुर्वी हा तरुण गीतांजली एक्स्प्रेस गाडीने ठाण्यात त्यांच्या ओळखींच्या सोबत कामताकरिता आला होता मात्र नंतर पुढचे त्याला काहीच माहित नाही असं तो तरुण पोलिसांना सांगत होता... प्राथमिक चौकशीत हा तरुण मनोरुग्ण असल्याचं समोर आलं होतं मात्र सखोल चौकशीत हा तरुण मनोरुग्ण नसून तो काम न मिळाल्या मुळे असं वागला असावा अशि माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनि दिलिये...

बाईट १ : स्मिता ढाकणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग

बाईट २ : मंगल रामपाल यादव (( पोलीस याची चौकशी करतानाचा बाइट वापरु शकतो ))Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.