ETV Bharat / city

ठाण्यात भटक्या श्वानावर गोळीबार; गुन्हा दाखल

कासारवडवली भागात एका भटक्या श्वानावर बंदुकीने (एअर गन) गोळी झाडल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

ठाण्यात भटक्या श्वानावर गोळीबार गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 20, 2021, 8:40 PM IST

ठाणे- कासारवडवली भागात एका भटक्या श्वानावर बंदुकीने (एअर गन) गोळी झाडल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. डोळ्याखाली गोळी लागल्याने विव्हळत असलेल्या श्वानावर प्राणीमित्रांनी तातडीने उपचार केले.याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

श्वानाला पशुवैद्यकिय रुग्णालयात केले दाखल-

कासारवडवली येथे राहणाऱ्या लवेश गवळी या प्राणि मित्राला शुक्रवारी सकाळी एका भटक्या श्वानाच्या डोळ्याखाली जखम आढळून आली. याप्रकरानंतर त्यांनी परिसरातील सिटीझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन (कॅप) संस्थेच्या सुशांक तोमर याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तोमर व गवळी या तरुणांनी तात्काळ या भटक्या श्वानाला वागळे इस्टेट येथील पशुवैद्यकिय रुग्णालयात दाखल केले. वैदयकिय तपासणीत या भटक्या श्वानाला गोळी लागल्याचे आढळून आले. याप्रकरणी,गवळी यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आधीही अनेक झाले आहेत गुन्हे-

भटक्या श्वानांवर या आधीही मारहाण करणे, अंगावरून गाडी घालणे, असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अशा गुन्ह्यांमध्ये प्राणीमित्र संघटना सोडले तर साक्ष पुरावे देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्यामुळे अशा गुन्ह्यात शिक्षा होत नाही.

हेही वाचा- दिलासा नाहीच, आज पुन्हा 6281 नवे रुग्ण; अमरावतीत मुंबईपेक्षा अधिक बाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.