ETV Bharat / city

रमजानच्या महिन्यात मुंब्य्रात पाणी प्रश्वावरुन भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; पाण्याचा टँकर पळवण्याचा प्रयत्न - भाजप

स्थानिक शिवसेना-भाजप नेत्यांनी खाजगी टँकर मागवून मशिदींमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करताच स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी धाव घेऊन हे टँकर अडवले.

मुंब्य्रात पाणी टँकरवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद
author img

By

Published : May 13, 2019, 7:26 PM IST

ठाणे - ठाण्यात एकीकडे आंब्यावरुन भाजप-मनसे आमने सामने असतानाच आता मुंब्र्यात पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. गेले अनेक दिवस येथील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच कल्याण येथे फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे त्रासात भरच पडली आहे.

मुंब्य्रात पाणी टँकरवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद

मुस्लिमधर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु असल्याने पाणी प्रश्न आणखीनच पेटला आहे. स्थानिक शिवसेना-भाजप नेत्यांनी खाजगी टँकर मागवून मशिदींमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करताच स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी धाव घेऊन हे टँकर अडवले. महापालिकेचे टँकर आणून आपण जनतेचे भले करत असल्याचा आव भाजप-शिवसेना करत असल्याची आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. तर, नमाज पडायला येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आपण हे खाजगी टँकर आणले असल्याचे स्थानिक भाजप नेत्या रिमा खान यांनी सांगितले.

आपणच जनतेचे कैवारी कसे आहोत हेच दाखविण्याचा प्रयत्न यातून आहे. त्याचे श्रेय लाटण्याचा पुरेपूर प्रयत्न होत होता. आपण तहानलेल्या जनतेसाठी आणलेले टँकर हायजॅक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. तर, केवळ मुस्लिमांना त्रास व्हावा म्हणून धर्मांध भाजपचा हा सगळा खटाटोप आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Intro:रमझान मध्ये श्रेयवादाच्या लढाईत पानी प्रश्न पेटला, मुंब्रा कौसा परिसरात पाण्याचा टँकर पळविण्याचा प्रयत्न
आव्हाड संतापलेBody:

ठाण्यात एकीकडे आंब्या वरून भाजप मनसे आमने सामने असतानाच मुंब्र्यात पानी प्रश्नावरून ncp शिवसेना भाजपा मध्ये आज खडाजंगी पहायला मिळाली. गेले अनेक दिवस येथील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच कल्याण येथे फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईन मुळे त्यांच्या त्रासात भरच पडली आहे. त्यातच मुस्लिमधर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु असल्याने पाणी प्रश्न आणखीनच पेटला आहे. आज स्थानिक शिवसेना आणि भाजप नेत्यानी खाजगी टँकर मागवून मशिदींमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करताच स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड सह अनेकानी धाव घेऊन हे टँकर अडवले. एकीकडे महापालिकेचे टँकर आणून आपण जनतेचे भले करत असल्याचा आव भाजप शिवसेना करत असल्याची बोंब ncp वाले मारत होते तर दुसरीकडे केवळ नमाज पडायला येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आपण हे खाजगी टँकर आणले असल्याचे स्थानिक भाजप नेत्या रीना खान यांनी सांगितले. आपणच जनतेचे कैवारी कसे आहोत हेच दाखविण्याचा प्रयत्न होतं असून त्याचे श्रेय लाटण्याचा पुरेपूर प्रयत्न होतं होता. आपण तहानलेल्या जनतेसाठी आणलेले टँकर हायजॅक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी केल्याचा थेट आरोप भाजपा नेत्यांनी केला तर केवळ मुस्लिमांना त्रास व्हावा म्हणून धर्मांध भाजप चा हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी करून राजकारण कोणत्याही थरा पर्यंत तापलंय याची झलक दाखविली. आता हा संघर्ष कुठपर्यंत जातो आणि त्यात जनतेची तहान भागते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Byte रिमा खान नगरसेविका Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.