ठाणे - महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे, तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू होती. यावेळी सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजीत यादव या भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला होता. हल्ल्यात कल्पिता पिपळे यांची तीन बोटे छाटली गेली होती व या हल्ल्यात त्यांना डाव्या हातावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्यांच्या बोटावर 6 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. शस्त्रक्रिया केलेल्या बोटाचा रक्त प्रवाह कमी असल्याची माहिती ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच दुसऱ्या बोटांचा भाग मिळाला नसल्याने ते बोट बसवण्यात आले नाही. त्यामुळे एकाच बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून कल्पिता पिंपळे यांना अजून एक दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पिंपळे यांची प्रकृती उत्तम -
कल्पिता पिंपळे या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त आहेत. त्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये त्यांची डाव्या हाताची दोन बोटे हल्लेखोरांने छाटली होती. यामध्ये त्यांची करंगळी आणि त्याच्या बाजूचे बोट वेगळे झाले होते. त्यामुळे त्वरित शस्त्रक्रिया देखील करण्याचा निर्णय ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने घेतला तब्बल 6 तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यांची प्रकृती उत्तम असून आता स्थिर आहे. दरम्यान हल्लेखोरांनी सुदैवाने अजून कुठे हल्ला केला नाही, या हल्ल्यातून त्या बचावल्या आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
डॉक्टरांच्या निगराणीत पुढील उपचार -
ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे, तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू होती. पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत प्रभाग समितीनिहाय अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर धडक कारवाई सुरू असून, शहरात विविध ठिकाणी कारवाईचा बडगा उगरण्यात आला होता. दरम्यान, घोडबंदर रोड येथे सोमवारी संध्याकाळी अशीच कारवाई सुरू असताना सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजीत यादव या भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला होता. हल्ल्यात कल्पिता पिपळे यांची तीन बोटे छाटली गेली होती व या हल्ल्यात त्यांना डाव्या हातावर प्रचंड जखमा झाल्या होत्या, तर उजव्या हाताला मार लागला होता. सद्या अजून एक दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला असून नंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा - hawker attack : बरे होऊन आपले काम सुरूच ठेवणार, कल्पिता पिंपळेंनी व्यक्त केला निर्धार