ठाणे - शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मॉलमध्ये प्रवेश करताना अँटिजेन कोरोना चाचणी करावी लागणार असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या संदर्भात आज पालिका प्रशासनाने आढावा घेवून हा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
संसर्ग कमी करण्यासाठी...
सद्यस्थितीत नागरिकांना गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. शहरातील मॉल्स, तसेच मार्केटमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नागरिकांची गर्दी कमी करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून मॉल्समध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांची अँटिजेन कोरोनाचाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टेस्टला सुरुवात
ठाणे शहरातील सर्व मॉल्समध्ये उद्यापासून अँटिजेन चाचणी सुरू होणार असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच मॉल्समध्ये प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती ठाणे पालिका उपायुक्तांनी दिली.