ठाणे आज ठाण्यातील दिवंगत नेते Leader of Thane आनंद दिघे यांची Anand Dighe death anniversary पुण्यतिथी. आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी आनंद दिघे यांचा गणेशोत्सवाच्या दरम्यान अपघात झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. आजही त्यांच्या मृत्यू बाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जातात. पण त्या दिवशी धर्मवीर आनंद दिघे यांना गमावले, त्याचे दुख आजही संपूर्ण ठाणेकरांसह महाराष्ट्राला आहे. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रांनी त्यांच्या सोबत घालविलेल्या आठवणी ताज्या friends gave us memories केल्या आहेत.
आनंद दिघे या नावाला राजकीय, सामाजिक वलय आहेच. पण हे नाव, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठीही खुप महत्वाचे आहे. कारण मुख्यमंत्री हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत आणि राजकीय सामाजिक वारसा आनंद दिघे यांच्या कडून मिळाल्याने, त्यांनी आज एवढे महत्वाचे पद भुषवले आहे, असे त्यांनी आतापर्यंत अनेकदा सार्वजनिक रित्या कबुल देखील केले आहे. आनंद दिघे यांची राजकीय सुरवात ही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून झाली. सुरवातीला सामाजिक काम करतांना बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसेनेबद्दल, आनंद दिघे यांना प्रेम निर्माण झाले. कालांतराने आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे हे एक घनिष्ठ नाते निर्माण झाले. या नात्यातून बाळासाहेबांनी आनंद दिघे यांना संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी दिल्यानंतर आनंद दिघे यांनी जिल्हाभर शिवसेनेची वाढ केली. पक्षाची वाढ करत असतांना आनंद दिघे यांना अनेक कार्यकर्ते मिळाले. ज्यांनी या पक्ष वाढीसाठी मोलाचे काम केले, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील होते. आनंद दिघे यांनी जिल्हाभर केलेले काम आणि त्यांची कामाची पद्धत ही सर्वसामान्यांपासून अनेकांना पसंतीची ठरली. त्यामुळे फक्त ठाण्यात नव्हे ,महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात आनंद दिघे हे नाव अगदी थोड्यावेळातच नावलौकिकाला आले. आनंद दिघे यांचे अहो रात्र सुरू असलेले काम हे संपूर्ण ठाण्याने अनेक दशक उघड्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणून आजही त्यांना ठाण्यात दैवत म्हणून मानले जाते.
बाहात्तर वर्षीय एकनाथ काजारी हे देखील आपल्या युवा अवस्थेपासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत काम करत होते. धर्मवीर आनंद दिघे यांनी आपले आयुष्याचा प्रवास हालाखीच्या दिवसातून सुरू केला आणि असे असतांनाही कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये ते मागे राहिले नाहीत. गरीब, थोर. श्रीमंत. लहान मोठे या सर्वांच्या अडचणी त्यांनी सोडवल्या आणि अशाच काही आठवणी आजही त्यांच्यासोबत काम केलेल्या मित्रमंडळींच्या मनात घर करून आहेत.
ठाण्यात सुरू केली मानाची दहीहंडी आज जगभरात ख्याती पसरलेली दहीहंडी ही ठाण्यात अनेक वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी सुरू केली. ही दहीहंडी सुरू झाल्यानंतर, या सणाला ठाणा मुंबईत उत्सवाचे स्वरूप आले आणि यातूनच आज 22 वर्षानंतर या खेळाला सरकारची मान्यता मिळाली आहे. ठाण्यातून सुरू झालेला हा खेळ आज जगभरात गेला असला तरी या खेळामध्ये पहिल्यांदा आवश्यक ती खबरदारी घेण्याचे काम आनंद दिघे यांनी एकनाथ गाजरी या त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यावर सोपविले होते. गाजरी यांनी जखमी गोविंदांवरती उपचार करणे आणि त्यावर सर्वतोपचार झाल्यावरच त्याला घरी सोडणे ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
दरबारात काय व्हायचे आनंद दिघे यांची ख्याती सर्वत्र पसरली असताना, त्यांचा दररोज ठाण्यातल्या टेंभी नाक्यावरती दरबार लागायचा. या दरबारामध्ये लोक आपल्या अडचणी समस्या घेऊन येत असत आणि त्या समस्या सोडवण्याचे काम आनंद दिघे हे करत होते. या दरबारामध्ये शाळेतील प्रवेश, बिल्डरचा त्रास, पोलिसांच्या समस्या अशा सर्व प्रकारच्या अडचणी नागरिक घेऊन येत होते. आणि या सर्व समस्या आनंद दिघे सोडवत असे.
काही वेळा दिघे साहेबांनी फटकारले देखील मुजोरी आणि मस्ती करणाऱ्या अनेकांना आनंद दिघे यांनी स्वतः फटकारले देखील होते. गरिबांवर अन्याय करणाऱ्या अनेकांना आनंद दिघे यांनी स्वतः फटकारले देखील होते. याचा प्रत्येय एकनाथ काजारी यांना देखील आला होता.
साहेबांनी माझी गाडी वापरली सर्वसामान्य गरिबांच्या अडचणी सोडवतांना, दिघे साहेबांना अनेक अडचणी येत होत्या. कारण गरीब घरातून आलेले आनंद दिघे हे सर्वसामान्यच होते. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नव्हते आणि हीच अडचण त्यांना अनेकदा भासत होती. मग अशावेळी त्यांना मदतीसाठी अनेक मित्र पुढे यायचे, त्यापैकी एक मित्र एकनाथ काजारी हे देखील होते, आनंद दिघे यांना फिरण्यासाठी काजारी नेहमी स्वतःचे वाहन उपलब्ध करून द्यायचे. दिघे साहेब हे माझ्या वाहनातून फिरत होते, हे आज देखील एकनाथ काजारी अभिमानाने सांगत आहेत.
हेही वाचा Women Equality Day 2022 स्त्रियांना मुलीला जन्म देण्याचा अधिकारही नाही, समानतेची चर्चा निरर्थक