ETV Bharat / city

Women Day 2022 : ठाण्यात महिलांच्या मूलभूत अधिकारांसाठी श्रमजीवी संगठनेचा 'निर्धार मोर्चा'

जागतिक महिला दिनाचे ( women Day 2022 ) औचित्य साधत श्रमजीवी संघटनेच्यावतीने ( Sharamajivi Sanghatna Morcha ) ठाण्यात मूलभूत अधिकार निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ठाणे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी महिला पुरुष सामील झाले होते.

author img

By

Published : Mar 8, 2022, 5:12 PM IST

Sharamajivi Sanghatna Morcha
Sharamajivi Sanghatna Morcha

ठाणे - जागतिक महिला दिनाचे ( women Day 2022 ) औचित्य साधत श्रमजीवी संघटनेच्यावतीने ( Sharamajivi Sanghatna Morcha ) ठाण्यात मूलभूत अधिकार निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ठाणे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी महिला पुरुष सामील झाले होते. ठाणे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मूलभूत अधिकार निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रतिक्रिया

विविध मागण्यांसाठी मोर्चा -

बाळाच्या नावासमोर वडिलांच्या नावाबरोबर आईचही नाव बंधनकारक करणे. यासाठी नावाच्या ठिकाणी सर्व शासकीय रेकॉर्डमध्ये व्यक्तीच्या नावाच्या ठिकाणी तीन जागांऐवजी चार रिकामी जागा करण्यात याव्या. तसेच सर्व आदिवासी कुटुंबांना अन्न अंत्योदय योजनेच्या यादीत समाविष्ट करा यासारख्या अनेक मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने हा निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातील बहुसंख्य महिला संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत. वडिलांसोबत आईचे नाव लावणे बांधकारक करून प्रत्येक आईलादेखील समानतेचा अधिकार देण्यात यावा ही प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. आदिवासी महिलांच्या आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. मात्र, हवा तसा न्याय आणि मागण्या पूर्ण होत नाहीत, जर आता मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा राज्य सरकारने आमच्याकडे लक्ष वेधलं नाही, तर येणाऱ्या काळात हजारोंच्या संख्येने हा मोर्चा मंत्रालयावर नेण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षा स्नेहा दुबे पंडित यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - OBC Reservation in MH : मराठा आरक्षणाप्रमाणे सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे वाटोळे - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.